गेल्या कित्येक दिवसापासून अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी छलांग या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार मुख्य भूमिका झळकणार असून तो पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतंच या चित्रपटातलं तेरी चोरियां हे नवीन गा’णं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या गाण्यात राजकुमार राव आणि नुशरत भरुचा यांची उत्तम केमिस्ट्री दिसून येत आहे. हे गाणं पायल देवने स्वरबद्ध केलं असून गुरु रंधावाने ते शब्दबद्ध केलं आहे.


“हे गाण माझ्यासाठी खूप खासं आहे, कारण मनालीत ‘इश्क तेरा’ या गाण्याची चित्रीकरण सुरु होतं आणि त्याचवेळी मला लवरंजन सरांनी ‘तेरी चोरियां’ ही हुक लाइन दिली. ही एक ओळ देऊन छलांगसाठी गाणं तयार करायच आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर हे गाणं तयारा करण्यात आलं आहे,” असं गुरू रंधावाने एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. तर निर्मिती अजय देवगण, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.