News Flash

अब लडना है! अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्यांसोबत दीपिकाचा खास व्हिडीओ

हर चेहरे को सवरना है, चांद का दाग भी भरना है..

अब लडना है! अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्यांसोबत दीपिकाचा खास व्हिडीओ

‘पद्मावत’नंतर आणखी एका सशक्त भूमिकेतून अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्यांसोबत एक खास व्हिडीओ शूट केला आहे. समाजाची मानसिकता बदलायला लावणाऱ्या या व्हिडीओतील संवाद गुलजार यांनी लिहिले आहेत.

बदल घडवून आणण्यासाठी आता लढणं गरजेचं आहे, असा संदेश या व्हिडीओच्या मार्फत दीपिका व तिचा सहकलाकार विक्रांत मेस्सीने दिला आहे. ‘देख समझके गौर करना है, थोडीसी कोशिश और करना है, अब लडना है. हर चेहरे को सवरना है, चांद का दाग भी भरना है, अब लडना है’, अशा आत्मविश्वास वाढवणाऱ्या ओळी या व्हिडीओत आहेत. दीपिकासोबतच लक्ष्मी अगरवालनेसुद्धा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 3:49 pm

Web Title: chhapaak ab ladna hai deepika padukone vikrant massey meghna gulzar ssv 92
Next Stories
1 हिंदू धर्मियांना पटकन थंड होण्याचा एक रोग आहे – शरद पोंक्षे
2 ‘भाई’चा बर्थडे यावर्षी पनवेलमध्ये नाही तर नव्या ठिकाणी होणार साजरा
3 अंडरटेकर पुन्हा WWEमध्ये परतणार?
Just Now!
X