News Flash

दीपिकानं नाव बदललं; रणवीर सिंगऐवजी लावलं ‘या’ व्यक्तीचं नाव

पाहा, दीपिकाने कोणाचं नाव लावलंय

गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री दीपिका पदुकोण सतत चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात हजेरी लावली होती. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकास्त्र डागलं होतं. त्यामुळे ती सतत चर्चेत येत होती. त्यातच तिचा ‘छपाक’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामुळे तिची चर्चा अधिकच वाढली. ‘छपाक’मध्ये तिने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर दीपिकाने सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे.

दीपिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणानर सक्रिय असते. त्यामुळे बऱ्याच वेळा ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत वैयक्तिक आयुष्यातीलही बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. अलिकडेच तिने ट्विटरवरं तिचं नाव बदललं आहे. विशेष म्हणजे दीपिकाने नाव बदलल्यानंतर रणवीर सिंगच्या नावाऐवजी एका दुसऱ्याच व्यक्तीचं नाव लावलं आहे.

दीपिकाने ट्विटरवर तिच्या नावात बदल करुन ‘मालती’ असं ठेवलं आहे. खरं तरं अनेकांना प्रश्न पडला असेल की मालती नक्की कोण आहे. तर ‘छपाक’ चित्रपटामध्ये दीपिका साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचं नाव मालती असं आहे.

वाचा : अमेरिकेच्या नागरिकांनाही वाटतो ‘या’ भारतीय दाम्पत्याचा हेवा; घराची रचना पाहाल तर व्हाल अवाक्

 दरम्यान, आतापर्यंत अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या नावात बदल केल्याचं दिसून आलं आहे. अभिनेता वरुण धवनदेखील बऱ्याच वेळा तो साकारत असलेल्या भूमिकांची नाव ठेवत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 8:48 am

Web Title: chhapaak actress deepika padukone changed her social media twitter name to malti ssj 93
Next Stories
1 Video : शाहिद कपूरला हे काय झालं?
2 ‘कुलवधू’नंतर पुन्हा जमणार सुबोध -पूर्वाची जोडी
3 फरहान-शिबानी बांधणार लग्नगाठ? जावेद अख्तर म्हणाले…
Just Now!
X