10 April 2020

News Flash

‘छपाक’आधी ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून उलगडली अ‍ॅसिडग्रस्त तरुणीची कथा

ही अभिनेत्री दीपिकाप्रमाणे विशेष लोकप्रिय झाली नाही

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. ‘छपाक’ हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे अनेकांचं लक्ष चित्रपटाकडे वेधलं आहे. मात्र अ‍ॅसिड हल्ला झालेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित यापूर्वीही एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून दीपिकापूर्वी अन्य एका अभिनेत्रीने याच धाटणीची भूमिका साकारली होती. परंतु ही अभिनेत्री फारशी लोकप्रिय झाली नाही.

‘छपाक’पूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये ‘उयारे’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटातून अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित व्यक्ती जीवनात संघर्ष करुन पुन्हा कशी उभी राहते हे दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वती थिरुवोथु हिने मुख्य भूमिका साकारली आहे.

‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना पार्वती थिरुवोथुच्या ‘उयारे’ची आठवण झाली. त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा तिची चर्चा रंगू लागली. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी ‘उयारे’ आणि तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यास सुरुवात केली. पार्वती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मल्याळम, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, ‘उयारे’ या चित्रपटामध्ये एका अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या तरुणीची कथा मांडण्यात आली आहे. खूप शिकून वैमानिक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. या चित्रपटात पार्वतीने मुख्य भूमिका साकारली आहे. कलाविश्वात पदार्पण करणारी पार्वती प्रथम छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करायची.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 12:28 pm

Web Title: chhapaak deepika padukone acid survivor parvathy thiruvothu ssj 93
Next Stories
1 का होतात कलाकारांमध्ये भांडणं? अक्षय कुमारने सांगितलं कारण
2 सर्वात सेक्सी महिला; तिने कतरिना, प्रियांकालाही टाकले मागे
3 जाट समुदायाचा विरोध : ‘पानीपत’मधून वादग्रस्त भाग काढला
Just Now!
X