28 February 2021

News Flash

‘जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं’, रिंकू राजगूरुची पोस्ट चर्चेत

तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

राज्यात इतर सणांप्रमाणेच शिवजयंतीच्या उत्साहावर करोनाने पाणी फेरलं आहे. तरीही सगळीकडे उत्साहाचे वातावरण असून, किल्ले शिवनेरीवर थाटात शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे अनोख्या शैलीत महाराजांना वंदन केले आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली असून ती या मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, “छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता” असे कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वी नांदेडमधील सारखनी येथील लेंगी महोत्सवाला रिंकू राजगूरुला पाहुणी म्हणून बोलवण्यात आले होते. रिंकूची एक झलक पाहण्यासाठी तेथे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. इतकी गर्दी पाहून आयोजकांना रिंकूच्या सुरक्षेसाठी धावपळ करावी लागली. दरम्यान तेथील लोकांना करोनाचा देखील विसर पडल्याचे दिसत होते.

‘सैराट’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातून रिंकू घराघरात पोहोचली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होता. पर्श्या आणि आर्चीची जोडी आजही अतिशय लोकप्रिय आहे. त्यानंतर रिंकूने ‘कागर’ या चित्रपटात काम केले. तिने ‘हण्ड्रेड’ या हिंदी वेब सीरिजमध्ये भूमिका साकारली. आता ती ‘अनपॉज्ड’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट पाच मंडळींनी बनवला होता. राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या महरातो हे एकत्र या चित्रपटासाठी काम करत आहेत. या चित्रपटात पाच लघुपट एकत्र करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 6:56 pm

Web Title: chhatrapati shivaji maharaj jayanti rinku rajguru post viral avb 95
Next Stories
1 ‘बोल्ड सीन शूट करताना त्याने…’, नियाने सांगितला शुटिंग दरम्यानचा अनुभव
2 शाहरुखचा मुलगाही ठरतोय किंग; त्याचे फोटो पाहिलेत का?
3 साराने शेअर केला ‘मिस्ट्री मॅन’चा फोटो, म्हणाली ओळखा पाहू…
Just Now!
X