“माझे वडील जर आज जिवंत असते, तर मेरे साई मालिकेचा मी एक भाग झाल्याचे पाहून त्यांना खूप अभिमान वाटला असता”, अशा शब्दांत अभिनेत्री छाया कदमने आनंद व्यक्त केला. ‘सैराट’, ‘न्यूड’ आणि ‘अंधाधुन’सारख्या नावाजलेल्या चित्रपटांमधील वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी छाया कदम ओळखली जाते. ‘मेरे साई’ मालिकेतील आगामी कथानकात ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

मेरे साई –श्रद्धा और सबुरी या मालिकेने अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. यात दाखवण्यात येणारे आगामी कथानक हे साईंच्या चरित्रातील एक महत्त्वाचे कथानक आहे. त्यामध्ये घरातील वयोवृद्धांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा : ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक येणार का?; सचिन पिळगावकर म्हणतात..

या मालिकेचा एक भाग होण्यातला आपला आनंद व्यक्त करताना छाया कदम म्हणते, “या मालिकेचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे. कारण माझे आई-वडील साईंचे परम भक्त आहेत. मला वाटते की, मेरे साई मालिकेत काम करण्याची संधी चालून येणे हा देवानेच दिलेला आशीर्वाद आहे.”

या मालिकेतील आगामी कथानक खूप संवेदनशील असून ती एका विधवा स्त्रीची, सरस्वतीची कहाणी आहे. घरातून बाहेर काढण्यात आलेली सरस्वती राहण्यासाठी आसरा शोधत असते. तिला साई भेटतात आणि ते तिच्या सर्व समस्या दूर करतात आणि जीवनाचा मार्ग दाखवतात. ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर संध्याकाळी सात वाजता प्रसारित होते.