दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाची निवड ५१व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) झाली आहे. मात्र हे यश पाहण्यासाठी आज सुशांत आपल्यात नाही. चित्रपटात सुशांतसोबत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्या अनुपस्थितीमुळे भावूक झाली आहे. श्रद्धाच्या करिअरमधला हा चित्रपट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
येत्या १६ ते २४ जानेवारीदरम्यान गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे. यादरम्यान सहकलाकारांसोबत चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी सुशांत नसल्याने श्रद्धा भावूक झाल्याचं कळतंय. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रद्धा आणि सुशांतची चांगली गट्टी जमली होती.
आणखी वाचा : अलिबागमध्ये कतरिना-विकी एकत्र? चाहत्यांनी फोटोमध्ये शोधला विकीचा चेहरा
हा चित्रपट ६ सप्टेंबर २०१९ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं असून सुशांत आणि श्रद्धाने त्यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय चित्रपटात वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नवीन पोलिशेट्टी, तुषार पांडे आणि प्रतिक बब्बर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2021 3:30 pm