मुंबई: राज्यात सोमवारपासून टप्प्याटप्प्याने नियमाचे शिथिलीकरण केले जात आहे. सरकारने अध्यादेशात सुचवलेल्या टप्प्यांनुसार पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात चित्रिकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे परिसर जिथे मोठ्या प्रमाणात चित्रिकरण के ले जाते ते तिसऱ्या वर्गात मोडतात. त्यामुळे नियमानुसार या परिसरात संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच चित्रिकरणाची परवानगी देण्यात आली आहे.

नव्या नियमांनुसार मुंबईत चित्रिकरण करायचे झाल्यास जैव सुरक्षा पध्दतीने करायचे का? त्याच पध्दतीने चित्रिकरण करायचे असल्यास वेळेची मर्यादा पाळावी लागेल का?, असे अनेक प्रशद्ब्रा मनोरंजन क्षेत्रातील लोकांसमोर आहेत. या आणि अशा अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांच्या पुढाकाराने रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर मनोरंजन क्षेत्रातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे.