स्टार प्रवाहवर २३ ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्र सप्तमीपासून सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दख्खनच्या राजाचा महिमा सांगणाऱ्या या पौराणिक मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळणार आहे. बालकलाकार समर्थ पाटील ज्योतिबाचं बालरुप साकारणार आहे.

समर्थ मूळचा कोल्हापुरातील सरवडे गावचा. ज्योतिबा हे त्याचं कुलदैवत. त्यामुळे लहानपणापासूनच ज्योतिबावर त्याची श्रद्धा आहे. याच दैवताचं बालरुप साकारायला मिळणं हा ज्योतिबाचा आशिर्वाद असल्याचं समर्थ म्हणाला. “मी या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. कोल्हापुरात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचं शूट होणार असल्याचं मी ऐकलं होतं. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. सेटवर आम्हा सर्वांचीच काळजी घेतली जातेय. निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि सहकलाकार सर्वच जण मला या नव्या भूमिकेसाठी खूप मदत करत आहेत. घोडेस्वारी मी शिकलो आहे ज्याचा या भूमिकेसाठी मला उपयोग होईल. फावल्या वेळात मी सेटवर त्याचा सरावही करत असतो.”

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

२३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.