News Flash

Photo : शेवंताच्या लहानपणीचे क्यूट फोटो पाहिलेत का ?

अपूर्वा ही लहानपणी प्रचंड गोड आणि तितकीच चुणचुणीत असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं

अपूर्वा नेमळेकर

अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकर हे नाव आता मराठी कलाविश्वाला नवीन राहिलेलं नाही. ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या अपूर्वाचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच तिच्या प्रत्येक लूकची, फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. त्यातच सध्या अपूर्वाच्या चाहत्यांमध्ये तिच्या लहानपणीच्या फोटोची चर्चा होताना दिसत आहे.

अपूर्वा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असून अनेक वेळा ती इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत असते. या फोटोंजमध्ये तिने तिच्या लहानपणीचे काही फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती तिच्या आईसोबत आहे. विशेष म्हणजे आरस्पानी सौंदर्य लाभलेली अपूर्वा ही लहानपणी प्रचंड गोड आणि तितकीच चुणचुणीत असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.

 

View this post on Instagram

 

Woh bachpan ke din !!! #apurvanemlekar #nostalgic #hazeleyes

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

View this post on Instagram

 

I wish you were here to tell me that everything’s gonna be okay. I miss u paa like anything.

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

View this post on Instagram

 

My mom my everything ..#happymothersday #apurvanemlekar

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

दरम्यान, अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून कलाविश्वामध्ये पदार्पण केलं. या मालिकेनंतर ‘आराधना’, ‘एकापेक्षा एक’,’तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केलं. तसंच तिने ‘चोरीचा मामला’, ‘आलाय मोठा शहाणा’ या नाटकांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर ती काही जाहिरांतींमध्येही झळकली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 9:32 am

Web Title: childhood photos of the shewanta apurva nemlekar ssj 93
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातली ‘जेबी’ आहे तरी कोण?
2 ”नेहाला स्पर्धकाने किस केलं तेव्हा परीक्षक शांत का?”; नेटकऱ्यांच्या प्रश्नावर विशालचं उत्तर
3 …म्हणून अजयने बदलली ‘तानाजी’ चित्रपटाच्या नावाची स्पेलिंग
Just Now!
X