News Flash

मुलांना सोडल्यामुळे अभिनेत्रीला सीरिजमधून दाखवला बाहेरचा रस्ता

जाणून घ्या आपला मुलांशी काही संबंध नाही म्हणणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

(Photo credit : zheng shuang instagram)

लोकप्रिय चिनी अभिनेत्री झेंग शुआंग वर्षाच्या सुरूवातीस मुलांना सोडून दिल्याबद्दल चर्चेत होती. ती Prada या फॅशन कंपनीची ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर होती. या घटनेनंतर तिला लगेच ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काढून टाकण्यात आले. आता तिला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून पण काढणार आहे. झेंग शुआंगला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे.

झेंग शुआंग ही ‘चायनीज घोस्ट स्टोरी’ या तिच्या आगामी सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत होती. मात्र, मुलांना सोडून दिल्यामुळे तिला त्यातून काढण्यात येणार आहे. सीरिजच्या ज्या सीनमध्ये ती आहे त्या ठिकाणी आता तिच्या चेहऱ्याच्या जागेवर ‘गुड बाय माय प्रिन्सेस’ या सीरिजमधील Peng Xiaoran या अभिनेत्रीचा चेहरा लावण्यात येणार आहे. यासाठी चायनीज अथॉरिटी फॉर एअरिंगने देखील परवाणगी दिली आहे.

जानेवारीत मुलांना सोडून दिल्याच्या बातमीमुळे झेंग शुआंगला ब्लॅकलिस्ट केले आहे. ‘Dt. Appledog’s Time’ च्या चित्रीकरणात छोट्या सीनमध्ये देखील तिला ब्लर करण्यात आले होते. ‘चायनीज घोस्ट स्टोरी’ या सीरिजसाठी तिला १६० मिलियन युआन देण्यात आले होते.

हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रोडक्शन कंपनी लीगल पद्धती वापरणार आहे. ‘चायनीज घोस्ट स्टोरी’ शिवाय झेंग शुआंगकडे ‘सिक्रेट किपर्स’ आणि ‘Jade Lovers’ या सीरिज देखील आहेत. या सीरिज अजून प्रदर्शित झालेल्या नाही. झेंग शुआंग तिच्या ‘Meteor Shower’ या मालिकेतील Chu Yuxun या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली होती.

झेंग शुआंगचा एक्स-बॉयफ्रेंड Zhang Hengने तिच्यावर आरोप लावले आहेत. तिने सरोगसीतून दोन मुलांना जन्म दिला. मात्र आता त्याचा ताबा घेण्यास नकार देतेय… त्या मुलांशी संबध नसल्याचं ती म्हणतेय…ही दोन्ही मुलं अमेरिकत जन्माला आली आहे. त्यांची सरोगेट आई ही तिथलीच आहे. आम्ही दोघे विभक्त झाल्यानंतर झेंग शुआंग सरोगसीने मिळालेल्या आपल्या दोन्ही मुलांना सोडून दिले. मुलांचा जन्म होण्याआधीच तिने त्यांचा बहिष्कार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 3:27 pm

Web Title: chinese actress zheng shuang will be digitally removed from drama series after being blacklisted for letting go her surrogate children dcp 98
Next Stories
1 …आणि गुरुजी म्हणाले,”रणबीरला हे काही जमणार नाही”; “त्यापेक्षा त्याला कराटे शिकवा”
2 अमिताभ-माधुरीसोबत केले होते काम; आता मोमोज विकून चालवतीये घर
3 ‘आत्महत्या करण्याचे विचार…’, ७ वर्षांपूर्वी असे काय घडले की रुबीना आजही विसरु शकली नाही
Just Now!
X