News Flash

हिमालयाच्या कुशीत रंगली चिराग व काजलची ‘लव बेटिंग’

मराठी सिनेमांमध्ये आता कधीही न पाहिलेली हटके लोकेशन्स दिसू लागली आहेत.

चिराग पाटील आणि काजल शर्मा

आशयविषय, सादरीकरणाच्या चौकटी मोडून मराठी चित्रपट आता नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. मराठी सिनेमे आता अनेक आकर्षक लोकेशन्सवर शूट होऊ लागले आहेत. मराठी सिनेमांमध्ये आता कधीही न पाहिलेली हटके लोकेशन्स दिसू लागली आहेत. आता हिमालयाच्या कुशीतील निसर्गसौंदर्यही ‘एस. एन.फिल्मस एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत आगामी ‘लव बेटिंग’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चिराग पाटील आणि काजल शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लव बेटिंग’ या सिनेमाच्या एका रोमॅण्टिक गाण्याचं चित्रीकरण हिमालयाच्या कुशीतील कुलू मनाली, सोलांग व्हॅली यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणी नुकतेच संपन्न झाले. ‘कधी कसे खुळे मन गुंतले, सारेच वाटे मग मज सोबती’ असे बोल असलेले हे गीत काजल शर्मा व चिराग पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. बर्फात लपेटून केलेली मौज मस्ती या संपूर्ण युनिटसाठी एक सुखद अनुभव होता. आपल्या या शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना काजल व चिराग सांगतात की, प्रेमात पाडणाऱ्या सुंदर अशा लोकेशन्सवर आम्ही ‘फुल्ल टू धमाल’ केली. हिमालयाच्या कुशीत असलेल्या या ठिकाणाहून आम्हाला परत येण्याची इच्छाच नव्हती.

‘लव बेटिंग’ या चित्रपटाची निर्मिती लालचंद शर्मा, सुनिता शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन राजू मेश्राम यांच आहे. ‘प्रेम’ या संवेदनशील विषयातील चढ-उतार, या सिनेमात पहायला मिळतील. चित्रपटाची कथा-पटकथा व संवाद दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी लिहिले आहेत. कौतुक शिरोडकर, राजू मेश्राम लिखित यातील गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीताची साथ दिली आहे. ‘लव बेटिंग’ चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत खंडागळे करत असून वेशभूषा पूनम चाळके तर कला दिग्दर्शन अनिल वठ यांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 8:34 am

Web Title: chirag patil and kajal sharma shoot for love beating at himalaya
Next Stories
1 अभिनेता- अभिनेत्रींच्या मानधनात भेदभाव होत नाही- महेश कोठारे
2 फ्लॅशबॅक : दोन शोमन जेव्हा एकत्र येतात…
3 मतदान करा आणि सिनेमाच्या तिकिटावर सूट मिळवा
Just Now!
X