News Flash

सोमवारपासून ‘चित्रभारती’ चित्रपट महोत्सव

‘प्रभात चित्र मंडळ’ या आघाडीच्या फिल्म सोसायटीच्या वतीने ‘चित्रभारती’ भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन २५ मेपासून नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात येत आहे.

| May 24, 2015 01:00 am

सोमवारपासून ‘चित्रभारती’ चित्रपट महोत्सव

‘प्रभात चित्र मंडळ’ या आघाडीच्या फिल्म सोसायटीच्या वतीने ‘चित्रभारती’ भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन २५ मेपासून नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय पारितोषिक विजेते ठरलेले भारतीय प्रादेशिक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. लघुपट स्पर्धाही घेतली जाणार आहे. सोमवारी, सायंकाळी ५ वाजता सज्जीन बाबू दिग्दर्शित ‘अनटू द डस्क’ या मल्याळम चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
२५ ते २७ असे तीन दिवस चव्हाण सेंटर येथे ‘मुक्ती’ (बंगाली), ‘बायसिकल किक’ (बंगाली), अदोम्या (आसामी), ‘ड्रीम झेड’ (इंग्रजी) आणि ‘क्रांतिधारा’ (उडिया) असे  चित्रपट दाखविण्यात येतील. त्यानंतर २८ मे rv07रोजी प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या थिएटरमध्ये लघुपट स्पर्धेतून निवडलेले लघुपट दाखविण्यात येतील. २९ मे रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या थिएटरमध्ये संध्याकाळी ‘चित्रभारती’ चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे. यंदाच्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ठरलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत यांचा सत्कार ‘प्रभात’तर्फे  यावेळी केला जाणार आहे. या समारंभानंतर राष्ट्रीय पारितोषिक विजेते ‘एक हजाराची नोट’ आणि ‘मित्रा’ असे दोन चित्रपट दाखविण्यात येतील. अधिक माहितीसाठी २४१३१९१८ या क्रमांकाद्वारे अथवा prabhatchitramandal1@gmail.com या ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2015 1:00 am

Web Title: chithra bharathi tulu film festiva
Next Stories
1 ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ का पाहावा याची कारणे..
2 सत्यघटनेवर आधारित ‘पाशबंध’
3 शॉटगन स्टाईलमधील सलमानचा ‘डबस्मॅश’ व्हिडिओ
Just Now!
X