News Flash

१५ वर्षानंतर ‘चित्रहार’ची होस्ट सध्या काय करते?

तराना २००१ ते २००४ दरम्यान 'चित्रहार'ची निवेदक होती.

‘चित्रहार’, १९८२ साली सुरु झालेला हा टीव्ही शो भारतीय टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय शोपैकी एक म्हणून ओळखला जातो. दर शुक्रवारी प्रसारित होणा-या या गाण्यांच्या सदाबहार शोने त्यावेळी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. ‘चित्रहार’ त्यात सादर केल्या जाणाऱ्या गण्यांमुळे लोकप्रिय होताच, पण त्याच बरोबर यात झळकणाऱ्या निवेदकांच्या खास शैलीमुळे देखील या शोची चर्चा असायची. अभिनेत्री तराना राजा ही देखील अशाच चर्चेत राहिलेल्या ‘चित्रहार’ निवेदकांपैकी एक होती. परंतु ती साध्या काय करते? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्की पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया तराना सध्या करतेय तरी काय?

तराना २००१ ते २००४ दरम्यान ‘चित्रहार’ची निवेदक होती. सुंदर चेहरा, कुरळे केस आणि बोलण्याच्या विशेष शैलीमुळे तिला या शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या शोने तिला एक वेगळी ओळख दिली. या शोनंतर तीने अनेक लहानमोठ्या जाहिरातींमध्ये व मालिकांमध्ये काम केले. ‘बडे अच्छे लगते है’, ‘साथिया’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिकांमधून मिळवलेल्या यशानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांच्या दिशेने वळवला. ‘प्यार के साईड इफेक्ट’, ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’, ‘जोडी ब्रेकर’ या चित्रपटांच्या माध्यमातून तिने सिनेक्षेत्रात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तिला खास यश मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तिने आपला मोर्चा निवेदनाच्या दिशेने वळवला. सध्या ती दुबईमध्ये एका रेडिओ कार्यक्रमात निवेदकाचे काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 3:21 pm

Web Title: chitrahaar tarana raja mppg 94
Next Stories
1 …म्हणून मी तिच्या प्रेमात आहे
2 लकी अभिनेत्रीचं नाव आयुषमाननं केलं जाहीर
3 …म्हणून युवराज सानियाला म्हणाला ‘हाय हाय मिर्ची’
Just Now!
X