बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग आणि पती गोल्फर ज्योति रंधावा यांचा घटस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिड-डे.कॉम येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार चित्रांगदा आणि ज्योती यांच्या नात्याला तडा गेली आहे. हे दोघेही नियमितपणे गुरगाव येथील न्यायालयात जाताना दिसले आहेत. २०१३ साली यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखला केला होता. आता न्यायालयाने त्यांच्या अर्जावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे.
चित्रांगदाने गोल्फपटू ज्योती याच्याशी २००१साली विवाह केला होता. त्यांना पाच वर्षांचा झोरावर रंधावा हा मुलगा आहे. न्यायालयाने झोरावरला चित्रांगदाकडे सोपावले आहे. ‘आय मी और मै’ या चित्रपटात झळकणारी चित्रांगदा तिच्या कामामुळे मुंबई-दिल्लीच्या वा-या करत आहे. ती आता तमिळ चित्रपट ‘अंजान’मध्ये काम करत असून तिची या चित्रपटात छोटी भूमिका आहे.

Chitrangada Jyoti Randhawa divorce,Chitrangada Singh,entertainment news,Joti Randhawa,