09 August 2020

News Flash

नोटाबंदीवर अनुराग कश्यपचा चित्रपट; अमृता सुभाष, उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत

'नेटफ्लिक्स'वर येत्या ५ जून रोजी होणार प्रदर्शित

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजनंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘चोक्ड’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची कथा नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर रचण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात अमृता सुभाष, उपेंद्र लिमये यांसारख्या मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळते.

सैय्यामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील काम करणाऱ्या महिलेची भूमिका ती साकारत आहे. अचानक एके दिवशी तिला किचनच्या पाइपमधून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवलेल्या नोटांची बंडल मिळते. या पैशांमुळे तिचं आणि तिच्या कुटुंबीयांचं आयुष्य थोडंफार सुधारतं. मात्र तेव्हाच नोटाबंदीची घोषणा होते. यानंतर तिला सापडलेल्या पैशांचं काय होतं, ते पैसे कुठून येतात याची उत्सुकता हा ट्रेलर पाहून निर्माण होते.

आणखी वाचा : बुर्ज खलिफामध्ये आहे सुपरस्टार मोहनलालचं घर; लाइफस्टाइलच्या बाबतीत राजा-महाराजांनाही देतात टक्कर

सैय्यामी खेरने २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘मिर्झिया’ या चित्रपटात तिने अनिल कपूरच्या मुलासोबत मुख्य भूमिका साकारली होती. ‘चोक्ड’ या चित्रपटात तिच्यासोबत रोशन मॅथ्यू, अमृता सुभाष, राजश्री देशपांडे, उपेंद्र लिमये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 12:06 pm

Web Title: choked trailer anurag kashyap latest is a dark tale on the effects of demonetization ssv 92
Next Stories
1 अनुष्काचा ‘पाताल लोक’ वादाच्या भोवऱ्यात; बजावली कायदेशीर नोटीस
2 लॉकडाउनमध्ये ‘लॉ ऑफ लव्ह’; पोस्टरचं डिजिटल अनावरण
3 सलमान जॅकलिनसोबत करतोय बाईक रायडिंग; व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X