बॉलिवूडमध्ये अनेक नृत्यदिग्दर्शक असून प्रत्येकाची नृत्यशैली आणि अंदाज वेगवेगळा आहे. या नृत्यदिग्दर्शकांमध्ये फराह खान हे नाव आग्रगण्य आहे. फराह खाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कलाकारांना नृत्य शिकविले आहे. फराहने केलेली कोरिओग्राफीही प्रेक्षकांनी उचलून धरली आहे. सध्या फराह सोनम कपूरच्या संगीताची तयारी करत असतांनाच यामध्ये एक व्यत्यय आल्याचं दिसून येतं आहे.
बॉलिवूड कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारी नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुखापतीमुळे ती पुढील काही आठवडे तरी हालचाल करु शकणार नाही अशी माहिती स्वत: फराहने दिली आहे.
पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे डॉक्टरांनीही तिला पुढील तीन आठवडे व्हिलचेअर वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तीन आठवडे तरी ती हालचाल करु शकणार नाही हे निश्चित. फराहने या घटनेची माहिती देत तिच्या व्हिलचेअरचा फोटोही पोस्ट केला आहे.
सोनमच्या संगीत समारंभामध्ये फराहवर महिलांना नृत्य शिकविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र या प्रसंगामुळे सोनमच्या संगीताची तयारी कशी पूर्ण होणार हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 5:41 pm