News Flash

IPLच्या उद्घाटन सोहळ्यात ‘या’ व्यक्तीच्या इशाऱ्यावर नाचणार हृतिक

यंदाचा आयपीएल उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरणार आहे.

हृतिक रोशन

क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची लोकप्रिय असणारी स्पर्धा म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल लवकरच सुरु होत आहे. भारत आणि भारताबाहेरचे क्रिकेटपटू या क्रिकेटच्या महाकुंभात सहभागी होत असल्यामुळे क्रीडाविश्वात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे आयपीएल सुरु होण्यापूर्वी या भव्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकडे अनेकांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आयपीएल २०१८ चा उद्घाटन सोहळा नयनरम्य असणार आहे.

आयपीएलचा यंदाचा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे. या सोहळ्यात सादर करण्यात येणाऱ्या डान्स परफॉर्मन्सची संपूर्ण जबाबदारी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावरने घेतली आहे. अभिनेता हृतिक रोशनही या सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. त्यामुळे आता हृतिकसाठी शामक नेमका कोणता जान्स फॉर्म निवडतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शामक आणि हृतिक या दोघांनी याआधी ‘धूम २’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. त्याशिवाय विविध पुरस्कार सोहळ्यांच्या निमित्तानेसुद्धा त्या दोघांनी एकत्र काम केल्याचं पाहायला मिळालं.

‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी

आयपीएलच्या ११ हंगामासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, सर्व सेलिब्रिटीही त्यांच्या परफॉर्मन्सवर जास्त लक्ष देत आहेत. यंदाचा आयपीएल उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरणार आहे. अभिनेता वरुण धवनसुद्धा या सोहळ्यात परफॉर्म करणार असून, या परफॉर्मन्ससाठी त्याचा सहा कोटी रुपये इतकं घसघशीत मानधन मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. कलाकारांना मिळणारं मानधन, त्यांचे अफलातून डान्स परफॉर्मन्स या साऱ्या उत्साही वातावरणात आयपीएलच्या नव्या पर्वाची सुरुवात नेमकी कशी होते, हे पाहण्यासाठीच अनेकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 1:31 pm

Web Title: choreographer shiamak davar to train bollywood actor hritik roshan for his ipl opening ceremony act
Next Stories
1 …म्हणून कंगना म्हणते, आयटम साँग नको रे बाबा!
2 Parmanu row: जॉन अब्राहमच्या अडचणीत वाढ, ‘जेए एंटरटेन्मेंट’विरोधात गुन्हा दाखल
3 शेवटची दोन वर्षंच राहिली आयुष्याची- केआरकेचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X