News Flash

छोट्या पडद्यावरील अभिनेत्याच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू, आईलाही झाला संसर्ग

त्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

‘छोटी सदरानी’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काम करणारा अभिनेता अमल सहरावतच्या वडिलांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्या आईची करोना चाचणी देखील पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. अमलने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहितील दिली आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर सक्रिय नसल्यामुळे मी तुमच्या मेसेजला उत्तर देऊ शकलो नाही आणि त्या बद्दल मी तुमची माफी मागतो. गेल्या महिन्यात माझे वडिल राज बेल सिंह यांचा करोनामुळे मृत्यू झाला. तसेच माझ्या आईची दोन वेळा करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्याचा काळ हा माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी देखील कठीण आहे’ असे अमलने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले.

 

View this post on Instagram

 

Dear Instagram Family I apologise for not being active and responding to your messages since few days . I lost my Father Mr Raj Bail Singh to Covid 19 last month and my mother also tested positive twice . It has been a testing time for me and my family , but thanks to good memories left by my father that’s helping us to sail through . I express my heartfelt gratitude to all my friends , relatives , entire #chotisarrdaarni team for standing by me and my family throughout . My special thanks to entire media for being so sensitive and co operative about it . I request everyone not to panic rather understand Covid 19 and follow all the instructions to prevent it .If any symptoms surface please contact doctor immediately . Loads of love to everyone , see you soon https://m.timesofindia.com/tv/news/hindi/amal-sehrawat-saw-dad-once-before-he-succumbed-to-covid-19/amp_articleshow/77146373.cms

A post shared by Amal (@amal_036) on

पुढे त्याने, ‘माझ्या कठीण काळामध्ये मला पाठींबा दिलेल्या मित्रांचे, कुटुंबीयांचे तसेच छोटी सरदारनी मालिकेच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार’ असे म्हटले आहे.

अमलने या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत देखील दिली. त्यावेळी त्याने त्याच्या वडिलांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे म्हटले. एका वेगळ्या कारणामुळे त्याच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे जेव्हा करोना चाचणी करण्यात आली तेव्हा रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते असे म्हटले.

त्यानंतर त्याने चाहत्यांना आवाहन केले की करोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच घाबरुन जाऊ नका. डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करा. करोनाची कोणतीही लक्षणे जाणवली तरी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 8:52 am

Web Title: choti sarrdaarni actor amal sehrawat father died by covid 19 mother also infected avb 95
Next Stories
1 Kargil Vijay Diwas: …अन् ‘त्या’ फोन कॉलवर दिलीपकुमार यांनी नवाज शरीफ यांना झापले
2 कुंपणच शेत खातं तेव्हा..
3 रसभरीत तरीही..
Just Now!
X