News Flash

पिक्चरसाठी कायपण! एका स्टंटसाठी दिग्दर्शकानं घडवला खरा विमान अपघात

स्टंट खरा वाटावा म्हणून खऱ्याखुऱ्या विमानाने इमारतील दिली धडक, अन्...

ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर ‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’, ‘डंकर्क’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. तो स्पेशल इफेक्ट किंवा अॅनिमेशन या प्रकाराला फारसं महत्व देत नाही. चित्रपटात खऱ्याखुऱ्या वस्तुंची तोडफोड करण्यावर त्याचा जोर असतो. ‘टेनेट’ या चित्रपटात तर त्याने एक विमान इमारतीमध्ये घुसवले होते. हा चकित करणारा अनुभव अभिनेता डेव्हिड वॉशिंग्टन याने सांगितला.

ख्रिस्तोफर नोलनचा ‘टेनेट’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात डेव्हिड वॉशिंग्टन याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमाब्लेंडला दिलेल्या मुलाखतीत डेव्हिडने तो विमानाचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “नोलन आजही जुन्या पद्धतीने चित्रीकरण करतो. स्पेशल इफेक्ट, क्रोमा की, अॅनिमेशन यांसारख्या तंत्रज्ञानावर त्याचा फारसा विश्वास नाही. त्यामुळे स्टंट वगैरे करण्यासाठी तो रिअल साईज मॉडेल्सची निर्मिती करतो. टेनेटमध्ये विमानाचा अपघात दाखवण्यात आला आहे. यासाठी त्याने एक खरी इमारत तयार करुन घेतली आणि त्यावर एक खरेखुरे विमान सोडले. विमान इमारतीवर आपटल्यामुळे एक प्रचंड मोठा विस्फोट झाला. हे दृश्य पाहून सेटवरील सर्व मंडळी घाबरली होती. हे चकित करणारे दृश्य पाहून प्रेक्षक थक्क होतील.”

नोलनच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘टेनेट’ असं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया देखील झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होईल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु करनो विषाणूचे वाढते संक्रमण पाहता प्रदर्शनाची तारीख आणखी पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 4:33 pm

Web Title: christopher nolan crashed a real plane into a real building in tenet mppg 94
Next Stories
1 अशा प्रकारे किरण कुमार यांनी केली करोनावर मात, सांगितला अनुभव
2 Video : बिग बी-आयुषमानमध्ये ‘जूतम फेंक’; गुलाबो सिताबोचं पहिलं गाणं प्रदर्शित
3 बिग बी म्हणतात, “बाहुबलीपेक्षाही माझ्या ‘या’ चित्रपटाने केली होती जास्त कमाई”
Just Now!
X