News Flash

भविष्यवाणी ठरली खरी; करोना काळातही ‘या’ चित्रपटानं केली कोट्यवधींची कमाई

करोनाला न घाबरता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात केली गर्दी

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या प्रतिकूल परिस्थितीचा जबरदस्त आर्थिक फटका सिनेसृष्टीलाही बसला आहे. युरोप आणि अमेरिकेतील काही मोजके देश सोडले तर सर्व ठिकाणचे सिनेमागृह सध्या बंदच आहेत. मात्र मोजक्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊनही ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पहिल्या तीन आठवड्यात ‘टेनेट’ या हॉलिवूडपटाने तब्बल ३०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कमाई केली आहे.

अवश्य पाहा – शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स

या चित्रपटाची निर्मितीसाठी २०० दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले होते. शिवाय करोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन तीन वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनसारख्या अनेक नामांकित ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्याची ऑफर निर्मात्यांना दिली होती. परंतु दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान त्यासाठी तयार नव्हता. वाट पाहिन पण सिनेमागृहातच येईन अशी जणू त्याने शपथच घेतली होती. अखेर लॉकडाउन उघडताच शक्य तितक्या देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. अन् आश्चर्याची बाब म्हणजे प्रेक्षकांनी देखील चित्रपटाला खुप चांगला प्रतिसाद दिला. करोनाकाळातही या चित्रपटाने तब्बल ३०० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.

अवश्य पाहा – “सरकारी पुरस्कार परत करणार होतीस ना?”; रियाची सुटका होताच स्वराने कंगनाला डिवचलं

टेनेट हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी आहे. ‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’, ‘डंकर्क’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर हा चित्रपट युरोपमध्ये प्रदर्शित झाला आहे. भारतातील अनेक मोठ्या कलाकारांनी युरोपमधील सिनेमागृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 4:50 pm

Web Title: christopher nolans tenet crosses 300 million dollars worldwide mppg 94
Next Stories
1 “इथे वाटीभर पाण्यात डुंबणाऱ्यांना नैसर्गिक मृत्यू येतो”; पायल घोषने उडवली बॉलिवूडची खिल्ली
2 “अवॉर्ड शो फक्त पैसे कमावण्यासाठी असतात”, सैफ अली खानचे वक्तव्य
3 ‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी सेलिब्रिटीही पुढे सरसावले
Just Now!
X