News Flash

“वाट पाहीन पण थिएटरमध्येच येईन”; बहुप्रतिक्षित ‘टेनेट’चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री डिंपल कपाडिया या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’, ‘डंकर्क’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. कठीणातील कठीण विषय तो अगदी सोप्या पद्धतीने चित्रपटात मांडतो. या विशेष शैलीमुळे अगदी कमी कालावधीत त्याने अफाट यश मिळवले. आता हा महत्वकांक्षी दिग्दर्शक आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अवश्य पाहा – ‘महाभारता’मध्ये या WWE सुपरस्टारने साकारलेली ‘भीम’ ही व्यक्तिरेखा

अवश्य पाहा – विकासचा छोटा भाऊही आला; ‘आत्मनिर्भर’वरून अभिनेत्याचा मोदींना टोला

नोलनच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘टेनेट’ असं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया देखील झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होईल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु करनो विषाणूचे वाढते संक्रमण पाहता प्रदर्शनाची तारीख आणखी पुढे ढकलण्याची शक्यता आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ख्रिस्तोफर नोलनने टेनेटला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. मी वाट पाहीन पण चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करेन असा निश्चयच त्याने केल्याचे भासत होते.

या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी जगातील सर्वात मोठ्या प्रोडक्शन कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स कंपनीने स्विकारली आहे. ‘टेनेट’ या शब्दाचा अर्थ सिद्धांत असा होतो. या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया व्यतिरिक्त माइकल केन, केनेथ ब्रेनॉग, एरॉन टेलर जॉनसन, क्लीमेंस पोसी आणि एलिजाबेथ डेबिकी हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. डिंपल यांच्या भूमिकेविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 5:25 pm

Web Title: christopher nolans time warping thriller tenet mppg 94
Next Stories
1 विराटसाठी पोस्ट केला व्हिडीओ; कतरिनाने दिला रिप्लाय
2 मिर्झा आणि बंकीची प्राइस्लेस जोडी; पाहा ‘गुलाबो सिताबो’चा भन्नाट ट्रेलर
3 विद्युत जामवालने सिगारेटने कापलं लिंबू; पाहा भन्नाट व्हिडीओ
Just Now!
X