News Flash

सनी देओलनं विमानात चोरल्या होत्या चंकी पांडेच्या महागड्या सिगरेट्स; कारण…

कसे चोरले होते सिगरेट?; चंकी पांडेनं सांगितला सनी देओलचा गंमतीशीर किस्सा

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो जनी देओल हा अत्यंत गंभीर प्रवृत्तीचा व्यक्ती असेल असं अनेकांना वाटतं. अनेक मुलाखतींमध्ये त्याला जेवढ्यास तेवढं बोलताना प्रेक्षकांनी पाहिलं आहे. परंतु खरं पाहाता तो खूप खोडकर आहे. रुपेरी पडद्यावरील अँग्री यंगमॅन खऱ्या आयुष्यात सतत थट्टा मस्करी करत असतो. सनीचा असाच एक चकित करणारा किस्सा अभिनेता चंकी पांडे याने सांगितला.

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘विश्मात्मा’ या चित्रपटात सनी देओल आणि चंकी पांडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक गंमतीशीर किस्सा चंडी पांडेनं एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. “आम्ही ‘विश्मात्मा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नैरोबी येथे गेलो होतो. त्यावेळी मी भरपूर सिगरेटची पाकिटं खरेदी केली होती. विमानात मी झोपलो असताना सनीने मला चिडवण्यासाठी माझे सर्व सिगरेट इतर प्रवास्यांमध्ये वाटून टाकले. बाथरुमला जाण्यासाठी उठलो तेव्हा मी सर्वांच्या हातात सिगरेटचं एक-एक पाकिट पाहात होतो. सुरुवातीला मला वाटलं विमानात आता फुकट सिगरेट देखील मिळते की काय? जेव्हा मी एका प्रवास्याला विचारलं तेव्हा संपूर्ण प्रकार माझ्या लक्षात आला. अशा खोड्या सनी नेहमी काढतो. तो कॅमेरासमोर गंभीर असतो पण ऑफ कॅमेरा तो एखाद्या लहान मुलांसारखा वागतो.” असा किस्सा चंकी पांडेनं सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 5:16 pm

Web Title: chunky pandey sunny deol expensive cigarette mppg 94
Next Stories
1 पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची हत्या
2 मी पुन्हा येईन, नवीन गाणं घेऊन; अमृता फडणवीसांचे ट्विट
3 ‘SSR ला विसरलीस का?’; बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करणाऱ्या अंकिताला नेटकऱ्यांचा सवाल
Just Now!
X