News Flash

CID फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

सोशल मीडियावर पोस्ट करत झाली भावूक..

CID ही छोड्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. क्राईम आणि सस्पेन्सने भरलेल्या या मालिकेने जवळपास २० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेत काम करणारी अभिनेत्री वैष्णवी धनराजच्या वडिलांचे निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. वैष्णवीने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.

वैष्णवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘मोठी स्वप्न पाहणारा गावातील एक मुलगा…गायीचे दुध काढण्यापासून ते MNC कंपनीचे उपाध्यक्ष होईपर्यंत… शिक्षणाचे महत्त्व त्यांना ठाऊक होते. वयाच्या चौदाव्या वर्षी पैसे कमावण्यासाठी गाव सोडले जेणेकरुन मिळालेल्या पैशातून पुस्तके खरेदी करता येतील आणि रस्त्याच्या लाइटच्या उजेडात अभ्यास करता येईल’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishnavi Dhanraj (@vaishnavidhanraj)

पोस्टमध्ये पुढे तिने म्हटले, ‘ते खूप मेहनती आणि हुशार होते. त्यांनी प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी विशेष मेहनत घेतली. ते अतिशय चांगले गायक होते. तुम्ही अजूनही इथे आमच्यासोबत आहात. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.. तुमची कायम आठवण येईल.’ या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishnavi Dhanraj (@vaishnavidhanraj)

वैष्णवीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘CID’, ‘ना आना इस देस लाडो’, ‘बेगूसराय’ अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 3:26 pm

Web Title: cid fame vaishnavi dhanrajs father passes away at 63 avb 95
Next Stories
1 हाय रे जुदाई…आलिया मिस करतेय रणबीरला!
2 ‘आई मी तुला म्हातारी होऊच देणार नाही…’, अंशुमन विचारेच्या मुलीचा व्हिडीओ चर्चेत
3 ‘पठाण’च्या सेटवरील शाहरुखचे व्हिडीओ लीक, किंग खानचे स्टंट व्हायरल
Just Now!
X