मनोरंजन…. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळाल्यावर अनेकांचं मन रुळवणारा एक घटक. मनोरंजनाच्या विविध साधनांना आणि माध्यमांना प्रत्येकाची पसंती असते. त्यातीलच एक माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या जवळपास अनेक चित्रपटांचे लाखो-करोडो रसिक स्वत:ला कट्टर चित्रपटप्रेमी म्हणवतात. अनेकजण तर त्यांचा हा स्वयंघोषित कट्टरपणा सिद्धही करतात. चित्रपटाच्या संवादांपासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तिरेखेपर्यंतची माहिती ठेवणाऱ्या या चाहत्यांचे कधीकधी कलाकारांनाही कुतुहल वाटते. तुम्हालाही जर स्वत:ला चित्रपटांबद्दल विलक्षण प्रेम वाटत असेल, तर चला, सिने ‘नॉलेज’च्या या गुंतागुंतीच्या एका प्रश्नाचं उत्तर देत सिद्ध करा तुमचं रसिकत्व..

‘नगिना’ हा १९८६ साली प्रदर्शित झालेला चित्रपट एका काल्पनिक कथेवर चित्रीत करण्यात आला होता. या चित्रपटात ऋषी कपूर, श्रीदेवी, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती हर्मेश मल्होत्रा यांनी केली होती. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीत दिग्दर्शक जोडीने संगीतबद्ध केलेली या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत. त्यातील ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ हे गाणे तर कोणीच विसरू शकत नाही. त्यावेळी या चित्रपटाची पटकथा, त्यातील संवाद आणि दिग्दर्शन याची बरीच प्रशंसा झाली होती. फिल्मफेअरने २०१३ साली ‘नागिना’ आणि ‘मि. इंडिया’ चित्रपटातील कामाकरिता श्रीदेवीला विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते.

पर्यायः
१. अमरिश पुरी
२. अनुपम खेर
३. प्रेम चोप्रा