मनोरंजन…. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळाल्यावर अनेकांचं मन रुळवणारा एक घटक. मनोरंजनाच्या विविध साधनांना आणि माध्यमांना प्रत्येकाची पसंती असते. त्यातीलच एक माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या जवळपास अनेक चित्रपटांचे लाखो रसिक स्वत:ला कट्टर चित्रपटप्रेमी म्हणवतात. अनेकजण तर त्यांचा हा स्वघोषित कट्टरपणा सिद्धही करतात. चित्रपटाच्या संवादांपासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तिरेखेपर्यंतची माहिती ठेवणाऱ्या या चाहत्यांचे कधीकधी कलाकारांनाही कुतुहल वाटते. तुम्हालाही जर स्वत:ला चित्रपटांबद्दल विलक्षण प्रेम वाटत असेल, तर चला, सिने नॉलेजच्या या गुंतागुंतीच्या एका प्रश्नाचं उत्तर देत सिद्ध करा तुमचं रसिकत्व..

वाचा : ‘नमस्कार, मी बिग बॉस बोलतोय..’

‘अ किस बिफोर डाइंग’ हा १९९१ साली आलेला ब्रिटीश-अमेरिकन चित्रपट आहे. जेम्स डीअर्डन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट इरा लेव्हिन यांच्या कांदबरीवर आधारित होता. ड्रामापट असलेल्या या चित्रपटात मॅट डिलॉन, सीन यंग, मॅक्स वोन सिडो आणि दिएन लॅड यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. १९९१ पूर्वी १९५६ साली याच कथेवर आणि याच शीर्षकाने पहिला चित्रपट आला होता. ‘अ किस बिफोर डाइंग’शी साम्य असलेल्या कथेवर १९९३ मध्ये एक हिंदी चित्रपट आला होता. त्या हिंदी चित्रपटाचे नाव तुम्हाला ओळखायचे आहे.

वाचा : मासिक पाळीबद्दल सोनम कपूर म्हणते..

प्रश्न : ‘अ किस बिफोर डाइंग’च्या कथेशी साम्य असलेला हिंदी चित्रपट कोणता?
पर्याय
१. कोहराम
२. दिल
३. बाझिगर

१९९३ मध्ये आलेल्या या हिंदी चित्रपटात त्यावेळच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी काम केले होते. या अभिनेत्रींना चित्रपटात आघाडीच्या एका खान अभिनेत्याची साथ मिळाली होती.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
कोणत्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या हाताला सहा बोटं आहेत?
उत्तर – हृतिक रोशन