News Flash

सिनेनॉलेज : ‘जख्म’मध्ये अजय देवगणच्या वडिलांची भूमिका कोणत्या सुपरस्टारने साकारलेली?

चर्चमधून बाहेर पडणाऱ्या एका हिंदू महिलेला (पूजा भट्ट) काही मुसलमान लोक रॉकेल टाकून जाळतात.

बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हिट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘जख्म’. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी पूजा भट्ट प्रोडक्शनसाठी केली होती. तेव्हा कुणाल खेमू बालकलाकार म्हणून या चित्रपटात दिसला होता. चित्रपटातील त्याच्या अभिनयाने सर्वांनाच तोंडात बोटं घालण्यास भाग पाडली होती.

वाचा : अमेय खोपकरमुळे संजय जाधवच्या चित्रपटाचे शीर्षक मराठीत?

धर्म, जात हा बऱ्याचदा वादाचा मुद्दा ठरतो. ९०च्या दशकात यावरून मुंबईत दंगली उसळल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर ‘जख्म’ हा चित्रपट आधारित आहे. चर्चमधून बाहेर पडणाऱ्या एका हिंदू महिलेला (पूजा भट्ट) काही मुसलमान लोक रॉकेल टाकून जाळतात. जवळपास मरणाच्या दारात गेलेल्या आपल्या आईला पाहून अजय (अजय देवगण) भूतकाळात रमतो. अजयची आई मुसलमान आणि वडील हिंदू असतात. त्यामुळेच त्याच्या आजीला या दोघांचं नातं मान्य नसतं आणि ती आपल्या मुलाचं दुसऱ्या मुलीशी लग्न करून देते. पण, एका अपघातात अजयच्या वडिलांचा मृत्यू होतो. आपली खरी ओळख लपवणाऱ्या एका मुसलमान महिलेची भूमिका पूजाने लिलया साकारली होती. त्यावेळी तिच्या प्रियकराची म्हणजेच अजयच्या वडिलांची भूमिका एका दाक्षिणात्य सुपरस्टारने साकारली होती. या सुपरस्टार अभिनेत्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे.

प्रश्न – ‘जख्म’ चित्रपटात अजय देवगणच्या वडिलांची भूमिका कोणत्या सुपरस्टारने साकारलेली?
पर्याय-
१. चिरंजीवी
२. कमल हसन
३. नागार्जुन

वाचा : ‘या घाणीत आम्हाला प्रयोग करायचाय’, सुमित राघवनने काढले नाट्यगृहाचे वाभाडे

अजय देवगण, पूजा भट्ट, सोनाली बेंद्रे यांच्या अफलातून अभिनयाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाला तेव्हा नर्गिस दत्त अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
‘सारांश’मध्ये वयोवृद्ध व्यक्तिरेखा साकारताना अनुपम खेर यांचे खरं वय काय होतं?
उत्तर- २८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 10:49 am

Web Title: cineknowledge bollywood quiz who played ajay devgan fathers role in zakhm
Next Stories
1 माझ्या काकांमुळेच सिनेसृष्टीत टिकलो- इमरान हाश्मी
2 अमेय खोपकरमुळे संजय जाधवच्या चित्रपटाचे शीर्षक मराठीत?
3 Raksha Bandhan 2017: ही आहेत बॉलिवूडमधील रक्षाबंधनची सदाबहार गाणी
Just Now!
X