News Flash

सिनेनॉलेज : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला हिंदी चित्रपट कोणता?

हा चित्रपट नेमका कोणता हे कमेंट बॉक्समध्ये जरुर कळवा.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

राष्ट्रीय पुरस्कार म्हटलं की अनेकांच्या नजरा काही चित्रपटांकडे वळतात. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलेची पोचपावती मिळावी असं वाटत असतं. त्यातच शासनदरबारी आपल्या कलेला दाद दिली जात आहे याची शान काही औरच. चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या कलाकारांच्या कलेची दाद देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी असाच एक महत्त्वाचा पुरस्कार देण्यात येतो. तो म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. १९५४ पासून आजतागायत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांविषयी नेहमीच उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पण कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही फारच महत्त्वाची असते त्याचप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही फार महत्त्वाचे आहेत.

कलाकारांच्या कारकिर्दीत महत्त्वाचं स्थान असलेला पहिलावहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या हिंदी चित्रपटाला प्रदान करण्यात आला होता ठाऊक आहे का? नाही….? हरकत नाही. डोक्याला चालना देण्यासाठी हे पर्याय नक्कीच तुमची मदत करतील.

१. काबुलीवाला
२. दो आँखें बारह हाथ
३. मिर्झा गालिब

हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच विविध विषय हाताळत कथानके साकारण्यात आली आहेत. विविध कलाकारांपासून ते अगदी ऐतिहासिक घडामोडींवर चित्रपटांतून प्रकाश टाकण्यात आला आहे. अगदी सुरुवातीपासूनच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सामाजिक विषयांना हाताळण्याचा पायंडा पाडण्यात आला होता. मुख्य पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला त्यावेळी इतरही महत्त्वाचे चित्रपट स्पर्धेत होते. पण, ‘त्या’ एका चित्रपटाने हा पुरस्कार मिळवत चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नवं पान लिहिलं. तर मग हा चित्रपट नेमका कोणता हे कमेंट बॉक्समध्ये जरुर कळवा.

पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
प्रश्न : ‘जख्म’मध्ये अजय देवगणच्या वडिलांची भूमिका कोणत्या सुपरस्टारने साकारलेली?
उत्तर : नागार्जुन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 10:22 am

Web Title: cineknowledge marathi bollywood quiz which was the first hindi movie to receive the national award
Next Stories
1 अक्षय-आरव किचनचा ताबा घेतात तेव्हा..
2 Dahihandi 2017 : …हा होता बॉलिवूडचा पहिला ‘गोविंदा’
3 वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे सोलापुरात आयोजन
Just Now!
X