24 February 2021

News Flash

चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘नटसम्राट’

जाणून घ्या, कोणत्या चित्रपटगृहात किती वाजता आहे 'नटसम्राट'चा शो

“कुणी घर देता का घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या,आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. याच नाटकावर आधारित काही काळापूर्वी नटसम्राट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता नाना पाटेकर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या तब्बल ७-८ महिन्यांनंतर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर नटस्रमाट पाहायला मिळत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून चित्रपटगृहांबाहेरदेखील या चित्रपटाचे मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. २७ नोव्हेंबरपासून ते ३ डिसेंबर २०२० या चित्रपटाचे शो सुरु असणार आहेत.

दरम्यान, ‘नटसम्राट’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर आणि विक्रम गोखले महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ३५ वर्षांनी या दोघांनी एकत्र काम केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 3:28 pm

Web Title: cinemas opened marathi movie natasamrat special screening ssj 93
Next Stories
1 ड्रायव्हरनंतर सलमानच्या मॅनेजरलाही करोनाची लागण
2 अभिनेत्री दिव्या भटनागरला करोनाची लागण’; प्रकृती नाजूक
3 मंजुळा दाखवणार डॉ. अजितकुमारचं खरं रुप? गावासमोर उघड होणार ‘ही’ गोष्ट
Just Now!
X