News Flash

सिनेछायाचित्रकार  मुणगेकर यांचे निधन

कामत यांनी स्थापन केलेल्या ‘कामत फोटो फ्लॅश’ या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी ते छायाचित्रकार म्हणून रुजू झाले. 

मुंबई : सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निवासस्थानी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. दामोदर कामत यांनी स्थापन केलेल्या ‘कामत फोटो फ्लॅश’ या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी ते छायाचित्रकार म्हणून रुजू झाले.  आर. के. स्टुडीओची निर्मिती  असलेल्या ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘धरम करम’, ‘हिना’ तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘अखियोंके झरोखेसे’, ‘नादिया के पार’, ‘सारांश’, ‘उपहार’, ‘गीत गाता चल’, ‘चितचोर’, ‘मैने प्यार किया’, एन. चंद्रा यांच्या ‘नरसिंहा’ यांसह  दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांचे स्थिर छायाचित्रण त्यांनी केले आहे. मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शित ‘सखी माझी’, कुमार सोहनी दिग्दर्शित  ‘जोडीदार’, ‘तुझ्याचसाठी’ अशा अनेक चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांचे स्थिर छायाचित्रण त्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:16 am

Web Title: cinematographer mungekar passes away akp 94
Next Stories
1 शाहरूख आणि भन्साळी  पुन्हा एकत्र काम करणार
2 ‘समाजबदलातून कलाकृती घडतात’
3 कलाकारांचा कृतिपट
Just Now!
X