News Flash

मुंबईत येण्यापूर्वीच कंगनाला आणखी एक दणका; सिनेमॅटोग्राफरने चित्रपट करण्यास दिला नकार

...म्हणून पीसी श्रीराम यांनी चित्रपट करण्यास दिला नकार

(संग्रहित छायाचित्र)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच तिच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बीएमसीने तिला नोटीसदेखील बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या या दणक्यानंतर कंगनाला आणखीन एक दणका बसल्याचं दिसून येत आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेला एक चित्रपट करण्यास सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांनी नकार दिला आहे. पीसी श्रीराम यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.

“एका चित्रपटात कंगना रणौतची मुख्य भूमिका असल्यामुळे तो चित्रपट करण्यास मी नकार दिला आहे. हा चित्रपट करत असताना मला मनातल्या मनात फार अस्वस्थता वाटत होती. त्यामुळे माझं मत मी निर्मात्यांना सांगितलं आहे आणि त्यांनीदेखील माझ्या मताचा आदर केला आहे.जेव्हा एखादी गोष्ट योग्य आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हाच असं काहीसं घडतं”, असं पीसी श्रीराम म्हणाले.

दरम्यान, पीसी श्रीराम यांनी कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यात अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 8:37 am

Web Title: cinematographer pc sreeram rejected kangana ranaut film ssj 93
Next Stories
1 उद्धव ठाकरे उद्या तुमचं गर्वहरण होईल, कंगनाने व्यक्त केला संताप
2 रिया चक्रवर्तीला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी
3 ‘जेठालाल’ने शेअर केला २६ वर्षांपूर्वीचा फोटो, म्हणाले..
Just Now!
X