Citizenship Amendment Act, Sushant Singh, Star Bharat, TV show Savdhaan India,

24 November 2020

News Flash

#CAA: विरोधात बोलल्याने अभिनेता सुशांत सिंहची ‘सावधान इंडिया’मधून हकालपट्टी ?

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया उमटत असताना अभिनेता सुशांत सिंहला मोठी किंमत मोजावी लागली आहे

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया उमटत असताना अभिनेता सुशांत सिंहला मोठी किंमत मोजावी लागली आहे. ‘सावधान इंडिया’ शोमुळे घऱाघऱात पोहोचलेल्या सुशांत सिंहला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं आहे. सुशांत सिंहने उघडपणे नागरिकत्व कायद्याला विरोध केला होता.

सुशांत सिंह २०११ पासून ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमाशी जोडलेला होता. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी त्याच्यावर होती. सुशांत सिंह याने स्वत: आपण आता ‘सावधान इंडिया’चा भाग नसल्याचं जाहीर केलं आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात बोलल्यानेच आपल्याला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं असल्याचे संकेत सुशांत सिंहने यावेळी दिले आहेत.

“…आणि सावधान इंडियासोबतचा माझा कार्यकाळ संपला आहे,” असं सुशांत सिंहने ट्विट करत म्हटलं आहे. यावेळी एका युजरने पोस्टवर कमेंट करत ही सत्य बोलल्यामुळे मोजावी लागलेली किंमत आहे का ? अशी विचारणा केली. यावर सुशांतने ‘ही छोटी किंमत आहे’ असं उत्तर दिलं. सुशांतने लिहिलं आहे की, “खूप छोटी किंमत आहे. अन्यथा तुम्ही भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरुंचा सामना कसा केला असता ?”.

सुशांत सिंहने २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘The Legend of Bhagat Singh’ चित्रपटात सुखदेव यांची भूमिका निभावली होती. सुशांत गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व कायद्याविरोधात बोलत आहे. जामिया विद्यापीठात जाऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईचाही त्याने निषेध केला होता. सावधान इंडिया ‘स्टार भारत’ वाहिनीवर प्रक्षेपण होत असून अद्यापही चॅनेलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 6:06 pm

Web Title: citizenship amendment act sushant singh star bharat tv show savdhaan india sgy 87
Next Stories
1 ‘कामकाज नाही तर आमदारांना भत्ताही नाही’; काँग्रेसचा प्रस्ताव पण भाजपाचा विरोध
2 देशभरातील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, सोनिया गांधींची मागणी
3 कुणाचंही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही -अमित शाह
Just Now!
X