चीनमधील वुहानमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे तीन हजारहून अधिक जणांना प्राण गमवावा लागला. चीनबरोबरच इतर ९० हून अधिक देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. तसेच भारतासह जगाच्या वेगवेगळया भागांमध्ये या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये करोना व्हायरसची माहिती दोन वर्षांपूर्वी देण्यात आल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेली ही क्लिप एक कोरियन वेब सीरिजमधील आहे. या सीरिजमधील एका भागात व्हायरस संदर्भात बोलणे सुरु आहे. हा व्हायरस अचानक मोठ्या प्रमाणावर पसरताना दिसत आहे आणि त्याचे नाव ‘करोना’ आहे. ताप येणे तसेच त्याची इतक लक्षणे ज्याप्रमाणे दाखवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सध्या जगात परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सीरिजमध्ये या व्हायरसवर कोणतीही लस नसल्याचे देखील म्हटले आहे.

‘My Secret Terrius’ असे या कोरियन वेब सीरिजचे नाव आहे. ही वेब सीरिज दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये प्रदर्शित झाली होती. या सीरिजच्या १०व्या एपिसोडमध्ये या व्हायरस विषयी बोलताना दिसत आहेत. सीरिज कोरियन भाषेमध्ये असल्यामुळे समजणे थोडे कठिण झाले आहे. पण खाली देण्यात आलेल्या इंग्रजी सबटायटलमुळे त्यांचे संवाद समजणे सोपे झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clip from korean drama 2018 hinting at coronavirus like outbreak goes viral avb
First published on: 27-03-2020 at 13:37 IST