लोकसभा निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, अशात 30 पेक्षा जास्त कलाकार हे पैसे घेऊन प्रचार करण्यास तयार आहेत असा दावा कोब्रा पोस्टने केला आहे. सुमारे 36 कलाकारांची एक यादीच या वेबसाइटने प्रसारित केली आहे. या वेबसाइटने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत 36 असे कलाकार आहेत जे पैसे घेऊन पक्षाचा प्रचार करण्यास तयार झाले आहेत. यामध्ये अनेक नावाजलेल्या कलाकारांचा समावेश आहे.

पैसे घेऊन प्रचार करणाऱ्यांमध्ये कोणत्या तारे-तारकांची नावं?
जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सुद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, पुनीत इस्सर, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकीतिन धीर, टिस्का चोप्रा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट्ट, सलीम जैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, सनी लिओनी, कोयना मित्रा, इवलिन शर्मा, पूनम पांडे

कॉमेडियन कोण?
राजू श्रीवास्तव, सुनील पाल, राजपाल यादव, उपासना सिंह, कृष्णा आणि अभिषेक, विजय पवार

कोरिओग्राफरही यादीत
गणेश आचार्य आणि संभावना सेठ

गायकही म्हणतात पैसे घेऊन प्रचार करू
अभिजित भट्टाचार्य, कैलाश खेर, मिका सिंग आणि बाबा सहगल

या सगळ्या कलाकारांनी पैसे घेऊन सोशल मीडियावर पक्षांचा प्रचार करण्यास संमती दर्शवल्याचं कोब्रा पोस्टने म्हटलं आहे. बॉलिवुडसाठी खळबळ उडवणारीच ही बातमी ठरते आहे. विद्या बालन, अरशद वारसी, रझा मुराद, सौम्या टंडन यांनाही अशा प्रकारची विचारणा करण्यात आली मात्र त्यांनी असं करण्यास सपशेल नकार दिला असेही कोब्रा पोस्टने म्हटलं आहे.

कोण काय म्हटले?
शक्ती कपूरने महिन्याला 1 कोटी रुपयांच्या बदल्यात सोशल मीडियावर पक्षाचा प्रचार करण्यास सहमती दर्शवली आहे.

डॅनियल वेबरला जर ओव्हरसिज सिटिजनशिप मिळाली तर आम्ही मोदींना पाठिंबा देऊ असे अभिनेत्री सनी लिओनीने म्हटले आहे

आपलं काम चांगल्या गोष्टी पसरवणं आहे, जर चांगले पैसे मिळत असतील तर असं करण्यास काय हरकत आहे असे जॅकी श्रॉफने म्हटले आहे

तुम्ही 28 तारखेला येणार असाल तर त्याच दिवशी संध्याकाळी पैसे माझ्या खात्यात जमा झाले तर बरे होईल, यासंदर्भात आपण एक एमओयूही करून घेऊ असे अमिषा पटेलने म्हटले आहे

मला वाटलं होतं की तुम्ही मला किमान 50 लाख रुपये महिना द्याल मी वेगळाच विचार करून आलो होतो असं अखिलेंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.

कोब्रा पोस्टने एक स्टिंग ऑपरेशन करून या संदर्भातले वृत्त दिले आहे. या सगळ्या कलाकारांनी पैसे घेऊन पक्षांचा प्रचार करण्यास सहमती दर्शवली आहे असे म्हटले आहे. ऑपरेशन कराओके असं नाव देऊन हे व्हिडिओ कोब्रा पोस्टने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही पोस्ट केले आहेत.