News Flash

Rajinikanth’s 2.0 mania : 2.0 पाहण्यासाठी ऑफिसला सुट्टी

कोईंबतूरमधल्या एका कंपनीनंदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

Rajinikanth’s 2.0 mania : 2.0 पाहण्यासाठी ऑफिसला सुट्टी
2.0

रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हणजे त्यांच्या दक्षिणेतील चाहत्यांसाठी तो दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. एखाद्या कलाकाराचं इतके जबदस्त चाहते जगात कुठेही पाहायला मिळणार नाही हे मात्र तितकंच खरं. इथे रजनीकांतचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटल्यावर त्यांच्या मोठ मोठ्या प्रतिमा उभारणं, त्यावर दुग्धाभिषेक करणं, पूजा बांधणं हे प्रकार इथे सर्रास पाहायला मिळतात. इतकंच नाही तर अनेक ऑफिसला सुट्टीही दिली जाते.

2.0 च्या निमित्तानं कोईंबतूरमधल्या एका कंपनीनंदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहावा यासाठी ही सुट्टी देण्यात आली. पद्मविभूषण सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपट पाहण्यासाठी एक दिवसाची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असं कंपनीनं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कंपनीनं चित्रपटाची तिकिटंही दिली आहेत.

तर दुसरीकडे एका चित्रपटगृहात खास रजनीकांत यांच्या एण्ट्रींवर नाचण्यासाठी चित्रपट चक्क ३ मिनिटं थांबवण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 2.0 हा भारतातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत अक्षय कुमार पहिल्यांदाच काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 5:26 pm

Web Title: coimbatore firm gives holiday to employees to watch 20
Next Stories
1 Video : ‘रजनी’प्रेमात चाहते सैराट; एण्ट्रीवर नाचण्यासाठी चित्रपट ३ मिनिटं केला ‘पॉझ’
2 अन् त्याने मुलाचे नाव ठेवलं ‘मतदान
3 …आणि म्हणून अलेक्सा म्हणते “अभी ना जाओ Beeeeppp कर”
Just Now!
X