आभास हा या मालिकेपासून करिअरची सुरुवात करणारी अपूर्वी नेमळेकर आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत बनली आहे. अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी शेवंता म्हणजेच अपूर्वा कलाविश्वासाठी नवीन राहिलेली नाही. ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या अपूर्वाचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच तिच्या प्रत्येक लूकची, फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. काही दिवसापूर्वी अपूर्वाने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता तिने २० वर्षाची असतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

अपूर्वा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असून अनेक वेळा ती इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत असते. या फोटोंजमध्ये तिने तिचे २० वर्षांची असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. आरस्पानी सौंदर्य लाभलेली अपूर्वा ही तेव्हाही अत्यंत सुंदर असल्याचं या फोटोकडे पाहून लक्षात येतं. या फोटोमध्ये तिचे घारे डोळे अनेकांचं लक्षवेधत असल्याचं दिसून येत आहे.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

 

View this post on Instagram

 

Me at 20 ! Memories . . #apurvanemlekar #goodolddays #meat20

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

दरम्यान, अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून कलाविश्वामध्ये पदार्पण केलं. या मालिकेनंतर ‘आराधना’, ‘एकापेक्षा एक’,’तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केलं. तसंच तिने ‘चोरीचा मामला’, ‘आलाय मोठा शहाणा’ या नाटकांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर ती काही जाहिरांतींमध्येही झळकली आहे.