कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधून दर आठवड्याला सदस्यांपैकी कोणीतरी एक घराबाहेर जाते. परंतु, महेश मांजरेकर यांनी घराबाहेर कोण जाणार याचा निकाल सोमवारी लागणार अशी घोषणा केली आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सध्या नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी रेशम आणि राजेश डेंजर झोनमध्ये आहेत. बिग बॉस मराठीमध्ये आज कुठल्या प्रकारचा टास्क बिग बॉस घरातील सदस्यांना देणार आहेत तसेच आज स्मिता गोंदकरसाठी आस्ताद काळाने मुंडन का केले हे जाणून घेण्यासाठी आजचे बिग बॉस मराठी पाहायलाच हवे.

कालच्या वीकेण्डचा डावमध्ये महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर आले होते. बिग बॉसने घरातील सदस्यांना काल एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये नावडत्या व्यक्तीचा फोटो असलेले मडके न पाहता फोडायचे होते. यावेळी मेघाने रेशमचा फोटो असलेले मडके फोडले तर रेशमनेही मेघाचा फोटो असलेले मडके फोडले. राजेशने सईचा फोटो लावलेलं मडकं फोडलं.
घरातील सदस्यांचा निरोप घेताना सचिन पिळगावकर यांनी घरातील सदस्यांना एक संदेश दिला. महेश मांजरेकर यांनी जेव्हा स्वप्नील आणि सचिन यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाचे नाव विचारले तेव्हा स्वप्नीलने मेघा आणि सईचे नाव घेतले तर सचिन यांनी उषा नाडकर्णी यांचे नाव घेतले.

आज रेशम आणि राजेश मधून कोण घराबाहेर जाणार… कोणाला विशेष अधिकार मिळणार… येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होणार… प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवणार… तसेच पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार हे पाहणे रंजक असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.