आज बिग बॉस मराठीमध्ये विकेण्डचा डाव रंगणार आहे. यात महेश मांजरेकर घरातील सदस्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी महेश यांनी स्पर्धकांनाच त्यांच्यातील खलनायक ठरवायला सांगितल्याने काहींनी सुशांतला तर काहींनी आस्तादला खलनायक ठरवले. काही स्पर्धकांनी मेघा आणि सईलाही खलनायक ठरवले. पण खलनायकासाठी सर्वात जास्त मतं आस्तादलाच मिळाली.

सुशांत आणि आस्तादला त्यांच्या टास्कमध्ये झालेल्या चुका आणि त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दलदेखील सल्ले दिले तसेच ते कार्यक्रमामध्ये चांगले दिसत नसल्याचेदेखील बजावले. या सल्ल्यानंतर सुशांत आणि आस्ताद किती बदलतात हे लवकरच कळेल. तेव्हा बघायला विसरू नका आज विकेण्डचा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही सदस्यांसाठी गाणी वाजवण्यात येणार आहेत आणि सदस्यांनी ते कोणासाठी आहे हे ओळखायचे आहे. जसे ‘पल भर के लिये हम कोई प्यार कर ले’ हे गाणे सईसाठी होते तर, ‘ना जाने कहा से आई है’हे गाणे शर्मिष्ठासाठी, ‘नाम बडे और दर्शन खोटे’ हे गाणे जुई गडकरी साठी वाजवण्यात आले आणि ते सदस्यांनी अचूक ओळखले. तसेच यावेळेस घरातून बाहेर कोणीही जाणार नसतानाही मांजरेकरांनी मेघाला सगळ्यांचा निरोप घे आणि बाहेर ये असे का सांगितले हे या भागात कळेल.

तेव्हा पाहायला विसरू नका आज विकेण्डचा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. तसेच या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होणार, कोण होणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन… कोणाला घर सोडावे लागणार… काय असतील या आठवड्यामधील टास्क… हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवी ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.