News Flash

बिग बॉस मराठी २: कोण आहेत स्पर्धक?, ओळखा पहिल्या अक्षरावरून

या आधी शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार दिसणार असल्याची चर्चा होती

बिग बॉस मराठी

सध्याचा सर्वात लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. गेल्या वर्षी बिग बॉस हा शो मराठी भाषेमध्ये सुरू करण्यात आला होता. लोकांच्या अप्रतिम प्रतिसादानंतर शो निर्मात्यांनी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. ही घोषणा झाल्यानंतर कोणते कलाकार शोमध्ये दिसणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती.

अशाच वेळी कलर्स मराठीने ‘खूप चर्चा रंगली… आता अनाऊन्समेंटची वेळ झाली कारण तो परत येतोय. भेटूया उद्या सकाळी ८ वा’ असे ट्विट करत चर्चांना दुजोरा दिला होता. आज बिग बॉस शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची नावे कळणार म्हणून चाहते आणखी उत्सुक झाले होते. परंतु कलर्सने प्रेक्षकांना आणखी कोड्यात टाकले आहे. ‘स्पर्धकांचं पहिलं अक्षर आम्ही दिलं… आता तुम्ही चालवा डोकं आणि सांगा कोणाची आहेत ही नावं? येऊद्या comments’ असे ट्विट केले आहे.

यामध्ये वै, आ, सु, चि, अ, प्रा अशी अक्षरे प्रेक्षकांना देण्यात आली आहेत. बिग बॉस मराठीच्या चाहत्यांनी ही नावे ओळखून कमेंट करण्यास सुरूवात देखील केली आहे. त्यामध्ये वैदेही परशुरामी, अक्षया गुरव, चिन्मय मांडलेकर, सुव्रत जोशी, अभिनय बेर्डे, सुयश टिळक या कलाकारांच्या नावाचा निष्कर्ष चाहत्यांनी लावला आहे.

या आधी बिग बॉस मराठीमध्ये ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार दिसणार असल्याची चर्चा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 3:16 pm

Web Title: colors marathi gave a hint about bigg boss marathi 2 contestant
Next Stories
1 ‘भाग मिल्खा भाग’ नाकारल्याचा अक्षयला होतोय पश्चाताप
2 जवान बिष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावर येणार बायोपिक
3 Video : वडिलांच्या तब्येतीविषयी रणबीरने व्यक्त केली काळजी; आलिया झाली भावूक
Just Now!
X