News Flash

“अबोल प्रेमाचा रांगडा बाज”, ‘जीव माझा गुंतला’ नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

या मालिकेतून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे विविध रंग आहेत. अशाच एका अनोख्या प्रेमाची काहणी लवकरच कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. ही प्रेम कहाणी मात्र काहीशी वेगळी आहे. या प्रेमाला एक रांगडा बाज आहे. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. कलर्स मराठीवर लवकरच सुरु होतेय ‘जीव माझा गुंतला’ ही नवी मालिका. या मालिकेतून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २१ जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा नात्यांचा, कुटुंबाचा विचार करणारी आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे अनुभवणं रंजक असणार आहे.

हे देखील वाचा: “नानू हलवाई ते नानू जलवाई”; आदित्य नारायणच्या ट्रान्सफॉर्मेशन लूकवर विक्रांत मेस्सीची मजेशीर कमेंट

हे देखील वाचा: ‘मेरे रश्के कमर’ गाण्यामुळे नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर ट्रोल, नेटकरी म्हणाले…

मालिकेबद्दल बोलताना, मराठी टेलिविजन प्रमुख, (वायाकॉम18) दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “आपण सगळे जवळपास दीड वर्ष भीषण अशा महामारीशी लढतो आहे. ह्या संकटकाळी खरी परीक्षा आहे ती आपल्यातील नाते संबंधांची. नात्यांची विविध रूपं या काळात आपण अनुभवली. नात्यांच्या विविध पैलूंवर विचार करून आणि नात्यातील अनोखी बाजू मनोरंजनातून आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतोच. ग्रामीण महाराष्ट्राच्या पाश्वर्भूमीवर आधारित ‘जीव माझा गुंतला’ मालिका एका सुंदर नात्याची वीण घालणार आहे. या मालिकेची मांडणी आणि चित्रीकरणामुळे प्रेक्षकांना ती नक्कीच आपलीशी वाटेल.

मल्हार – अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 12:51 pm

Web Title: colors marathi new serial coming soon jiv majha guntala a different love story kpw 89
Next Stories
1 ‘मेरे रश्के कमर’ गाण्यामुळे नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर ट्रोल, नेटकरी म्हणाले…
2 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चित्रपट येणार? आसित मोदी म्हणाले..
3 ‘कमी वयात झालं होतं लग्न; एकवर्ष ही टिकला नाही संसार’, नीना गुप्ता यांचा खुलासा
Just Now!
X