कलर्स मराठीवर ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ ही मालिका येत्या सोमवारपासून म्हणजेच २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. सुरु होत आहे. मालिकेच्या शीर्षक गीताचे नुकतेच रेकॉर्डिंग झाले असून बॉलीवूड तसेच मराठी सिनेमांमध्ये एका पेक्षा एक गाणी गायल्यानंतर सुनिधी चौहान आता मराठी मालिकेकडे वळाली आहे. या मालिकेचे शीर्षक गीत सुनिधी चौहानच्या आवाजामध्ये स्वरबध्द करण्यात आले आहे.

हिंदी सिनेमासृष्टीतील बरेचसे गायक मराठी शीर्षक गीतांना आवाज देत आहेत. या आधीही कलर्स मराठीवरील ‘चाहूल’ मालिकेचे शीर्षक गीत शाल्मली खोलगडेने गायले होते. तर ‘सख्या रे’ मालिकेचे शीर्षक गीत मोनाली ठाकूरने गायले होते. मराठी मालिकांची शीर्षकगीते ही मालिकांसाठी खूप महत्त्वाची असतात. शीर्षकगीतांमधूनच प्रेक्षकांना मालिकेच्या कथेविषयी माहिती मिळते. म्हणूनच मालिकेची टीम मालिकेच्या चित्रिकरणासोबतच शीर्षक गीतालादेखील तितकेच महत्व देते.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Majhya Navaryachi Bayko fame actor mihir Rajda played Bhakt Pralhad and Young Sudama in TV Serial Shri Krishna of Ramanand Sagar
रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ मालिकेतील चिमुकल्याला ओळखलंत का? मराठी मालिकेत अभिनेता, लेखक म्हणून केलंय काम

सुनिधीने चौहानने हे गाण अत्यंत अप्रतिम गायले असून, या गाण्याला तिने एक खास टच दिला आहे ज्यामुळे हे गाणे अधिकच सुरेल वाटते. हे शीर्षक गीत मंदार चोळकर याने लिहिले असून, रोहन- रोहन यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. शीर्षक गीताचे नृत्यदिग्दर्शन मराठीतील सुप्रसिध्द नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारेने केले आहे. प्रेक्षकांना देखील हे गाणे नक्कीच आवडेल यात शंका नाही.

कुंकू, टिकली आणि टॅटू मालिकेतील शीर्षक गीतामध्ये सारिका निलाटकर, श्वेता पेंडसे आणि भाग्यश्री न्हावले तसेच मालिकेमध्ये आजी यांवर चित्रित केले आहे. शीर्षक गीताच्या बोलांपासून ते बायकांचा पोशाख तसेच सिग्नेचर स्टेप ते सेटअप पर्यंत सगळेच अत्यंत हटके आहे. गाणे चित्रित करताना तसेच ते लिहिताना मालिकेतील तीन विचारसरणीला प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. आधुनिकता आणि पारंपरिक गोष्टी या दोन्ही गोष्टींची उत्तमरीत्या सांगड घातलेली दिसून येते.

तेव्हा मालिकेचे हे हटके शीर्षक गीत प्रेक्षकांना ऐकायला आणि पाहायला नक्कीच आवडेल यात शंका नाही. तेव्हा पाहायला विसरू नका ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.