News Flash

‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेला नवे वळण!

देवयानीने प्रेमला पूर्णत: आपल्या जाळ्यामध्ये अडकवले आहे.

कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये राधा आणि प्रेम यांच्यात सगळे सुरळीत सुरू होते. राधाने प्रेमचा व्यवसाय चालविण्यास मदत करणे, त्याच्यासोबत ऑफिसला जाणे, राधाचा प्रेमला पुरेपूर आधार मिळत होता. प्रेमने राधाच्या पाठिंब्याने तो माधुरीचा मुलगा नसून त्याला दत्तक घेतले होते हे त्याचे आयुष्यातले खूप मोठे सत्यदेखील पचवले. राधाने खूप आव्हांनाना पार करत मोठ्या जिद्दीने स्वत:चा संसार सांभाळला आहे.

प्रेमच्या मनामध्येदेखील तिने स्वत:ची हक्काची अशी जागा बनवली . परंतु हे सगळे मात्र दीपिकाची आई देवयानीला रुचले नव्हते. तिने राधा आणि प्रेमच्या विरोधात खूप मोठे कारस्थान रचले आणि त्यामध्ये ती यशस्वीदेखील झाली. देवयानीने राधाच्या भोळ्या स्वभावाला लक्षात घेऊन तिला विषप्राशन करण्यास प्रवृत्त केले. आणि प्रेमच्या प्रेमाखातर हे करण्यास राधा तयारदेखील झाली. राधा आता प्रेमच्या आयुष्यात नाही म्हणजेच आपल्या आयुष्यात नाही याची कल्पनादेखील प्रेमला नाहीये.

देवयानीने प्रेमला पूर्णत: आपल्या जाळ्यामध्ये अडकवले आहे. संपूर्ण कुटुंबाला तिने बंगलोरमध्ये विपश्चना सेंटरमध्ये आहे असे सांगितले आहे. यावर सगळ्यांचा विश्वासदेखील बसला आहे. इन्सपेक्टर राजेदेखील देवयानीची साथ देत असून त्याने प्रेमला खोटे सांगितले की, राधा सेंटरमध्ये सुरक्षित आहे. पण प्रेमला सत्य कधी कळणार? प्रेमसमोर देवयानीचा खरा चेहरा आला तर? दीपिकाचे आयुष्य सावरण्यासाठी देवयानीने राधाला मारून टाकले हे सत्य आता फक्त आदित्यला कळाले असून, आता पुढे मालिकेमध्ये काय होणार? हे जाणून घेणे खूपच रंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 7:20 pm

Web Title: colors marathi radha prem rangi rangali new track
Next Stories
1 Video: आजीला सोडताना भावूक झाली आराध्या
2 इंधन दरवाढीवर आता गप्प का ? अमिताभ, अक्षय कुमार, सलमानवर नेटकऱ्यांचा भडका
3 ‘या’ ठिकाणी हनिमूनला गेली सोनम कपूर?
Just Now!
X