01 March 2021

News Flash

Big Boss Marathi: स्पर्धक म्हणतात ‘बिग बॉस तुमचा आमच्यावर भरवसा नाय काय?’

पुष्कर आणि सईच्या मैत्रीवर आणि स्मिता आणि रेशम वरदेखील या गाण्यामध्ये खास ओळी लिहीण्यात आल्या

आज बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी ‘बिग बॉस तुमचा आमच्यावर भरवसा नाय काय?’ हे गाण तयार केले आहे. हे संपूर्ण गाणं आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हे गाणं त्यागराज खाडिलकरने म्हंटले आहे. ज्यामध्ये घरातील जोड्यांवरदेखील ओळी बनविल्या आहेत. अतिशय सुंदर प्रकारे हे गाण सादर करण्यात आले आहे.

‘बिग बॉसच्या दारी लिंबू मिरच्या… मराठी सिझनचीच चर्चा… सेलेब्रिटी पोरांचा मेन रोल… बिग बॉस तुम्ही आमच्या संग गोड बोल…’ अशा त्या गाण्याच्या काही ओळी आहेत. मेघा, शर्मिष्ठा आणि आऊ यांच्यावरदेखील या गाण्यात ओळी लिहीण्यात आल्या आहेत. ‘मेघा, शर्मिष्ठा आणि आऊ… रोज रोज देतात खाऊ… कुणीतरी सांगा त्यांना कमी बोल… बिग बॉस तुम्ही आमच्या संग गोड बोल…’ या सगळ्यात पुष्कर आणि सईची मैत्री कशी काय मागे राहील. त्यांच्या मैत्रीवर आणि स्मिता आणि रेशम वरदेखील या गाण्यामध्ये खास ओळी लिहीण्यात आल्या आहेत. तुमच्या आवडत्या स्पर्धकांनी तयार केलेलं हे गाणं आज पाहायला विसरू नका.

रेशमचे सई, मेघा आणि आऊसोबत बऱ्याचदा खटके उडताना, एकमेकांविरुध्द बोलताना आपण पाहिले आहे. पण आज रेशम आणि सई यांच्यामध्ये एक चर्चा होणार आहे ज्यामध्ये रेशम सईला तिचा मुद्दा समजवून सांगणार आहे. तसेच सईने या खेळामध्ये रेशमला काही बोले तरी ती त्यावरून सईला कधीच जज करणार नाही असे रेशम सईला सांगताना दिसणार आहे. त्यांच्यातली ही चर्चा सई आणि रेशममध्ये मैत्रीची सुरुवात असेल का… सईचे यावर काय म्हणणे असेल… हे पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी – विकेण्डचा डावमध्ये आज रात्री ९.३० आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 6:04 pm

Web Title: colors marathi reality show big boss marathi todays episode precap
Next Stories
1 रोहित राऊतच्या ‘कधी कधी’ गाण्याची तरुणाईमध्ये क्रेझ
2 सामाजिक बांधिलकी जपणारा असाही एक मराठी निर्माता
3 खेळाच्या रूपात प्रथमच चमकणार लाल मातीतील ‘गोटया’
Just Now!
X