21 October 2020

News Flash

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास

कलर्स मराठी वाहिनीवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

लक्ष्मी आणि आर्वी

गणेशोत्सवानंतर येणारा उत्सव म्हणजे नवरात्रौत्सव. नऊ दिवस देवीची उपासना केली जाते. या नऊ दिवसांत सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते. कलर्स मराठी वाहिनीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेतील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकरने नवरात्रीबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

‘नवरात्रीमध्ये मी आवर्जून वेळ काढून देवीच्या दर्शनाला जाते. आधी मी गरबा किंवा डान्सच्या स्पर्धेत भाग घ्यायचे आणि मला बरीच बक्षीसेदेखील मिळाली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता,कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवींची रुपं आहेत. या नऊ दिवसांत नऊ वेगवेगळे रंग आहेत. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो.’

Video : नागराज मंजुळे निर्मित पहिला मराठी चित्रपट ‘नाळ’

‘महिला वर्ग हे नऊ रंग फॉलो करताना दिसतात. मी सुद्धा या रंगांनुसार कपडे परिधान करण्यास प्राधान्य देते. गरबा, दांडिया, भोंडला खेळायला मला खूप आवडतं. सगळीकडेच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. त्यामुळे मला नवरात्र खूप आवडते,’ असं समृद्धी सांगते.

या मालिकेत नि:स्वार्थ नात्याची कथा मांडण्यात आली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 6:22 pm

Web Title: colors marathi serial laxmi sadaiv mangalam laxmi and arvi navratri celebration
Next Stories
1 #MeToo: आम्ही कधी भेटलोच नाही; सोना मोहपात्राच्या आरोपांवर अनू मलिक यांचं स्पष्टीकरण
2 ‘हेलिकॉप्टर इला’ म्हणजे काय रे भाऊ?
3 ‘कन्यापूजेऐवजी मुलींना सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्याचे समाधान वेगळेच’
Just Now!
X