‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये सध्या प्रेम आणि राधासमोर अनेक अडचणी आणि आव्हाने येत आहेत. एकीकडे दीपिकाची बळजबरी आणि दुसरीकडे राधाचा असलेला विश्वास. तसेच प्रेमने आईला दिलेले वचन यामध्ये तो पूर्णपणे अडकलेला आहे. श्रावणी काकुच्या अन्विताला वारंवार घालून पाडून बोलण्याला कंटाळून आदित्यने तिला घराबाहेर काढले होते. राधा आणि प्रेमला हे कळताच ते श्रावणी काकुला शोधायला घराबाहेर पडतात आणि राधाच्या सांगण्यावरून श्रावणी काकू घरी येतात.

राधा आणि प्रेमची वाढती मैत्री बघून दीपिकाला प्रेम आणि राधाच्या नात्यावर संशय येतो. येणाऱ्या भागांमध्ये दीपिका आणि तिची आई प्रेमला एका तासाची मुदत देतात, या एका तासात प्रेमने राधाला घटस्फोट दिला नाही तर त्याचा व्यवसाय आणि त्याचे व्यैयक्तीक आयुष्यदेखील धोक्यात येईल अशी धमकी देखील ते प्रेमला देतात. प्रेम दीपिका आणि तिच्या आईच्या धमकीमुळे खूप गोंधळून जातो. दीपिका गरोदर आहे पण हे बाळ खरोखरच प्रेमचं आहे का की प्रेमला अडकविण्यासाठी दीपिका प्रेमशी खोटं बोलते आहे? प्रेमच्या मनात असणारे हे प्रश्न तो राधाला सांगेल का? राधाचं यावर काय म्हणन असेल? असे अनेक प्रश्न प्रेमला पडणार आहेत.

या संकंटामधून कसा मार्ग काढावा? या अडचणीतून बाहेर येण्यासाठी प्रेम राधाला विश्वासात घेऊन त्याच्या भावना व्यक्त करेल का? राधा त्याला समजून घेईल का? प्रेमला राधाची साथ मिळेल का? हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली मालिकेचा महाएपिसोड २५ मार्च फक्त कलर्स मराठीवर.