18 February 2019

News Flash

‘तू माझा सांगाती’मध्ये शेखर फडके वेगळ्या भूमिकेत

या मालिकेत तो चरित्र भूमिका साकारत आहे

शेखर फडके

प्रत्येक कलाकार हा आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आपली मालिकेत किंवा सिनेमात असणारी व्यक्तिरेखा चांगली साकारली जावी यासाठी तो कलाकार ती भूमिका समरसून जगत असतो. आपली प्रत्येक भूमिका अगदी प्रामाणिकपणे साकारणारा शेखर फडके आपल्याला एका नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. नेहमीपेक्षा वेगळा लुक आहे. या मालिकेत तो चरित्र भूमिका साकारत आहे. संगीत कुलकर्णी या मालिकेचा निर्माता आणि दिग्दर्शक आहे.

अनेक मराठी नाटकांमध्ये, मालिकांमध्ये तसेच सिनेमांमध्ये शेखर फडकेच्या अभिनयाचे अनेक पैलू आपल्याला पहायला मिळाले आहेत. या मालिकेतही त्याच्या अभिनयातील वैविध्यता आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्याने विनोदी भूमिका, तसेच कलर्स मराठी वरील ‘सरस्वती’ मालिकेतील ‘भिकूमामा’ हा विनोदी खलनायक साकारला. आता ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत त्याचा गंभीर स्वरूपाचा अभिनय पहायला मिळेल.

‘विठ्ठल’ हे पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्याच्या मुखी असलेलं नावं. या नावाची महिमा अशी आहे की नाव उच्चारताच अंगी उत्साह जाणवतो. विठ्ठलाचे नित्सिम भक्त असणाऱ्या संतांची परंपरा सांगणारी कथा, कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत पहायला मिळत आहे. सध्या मालिकेत संत ज्ञानेश्वर यांची महती सांगण्यात येत आहे. शेखर फडके याने आपल्या विनोदी शैलीतल्या भूमिकांनी प्रेक्षकांना हसवलं आहे. तो साकारत असलेली विठ्ठलपंतांची भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल यात शंका नाही.

First Published on February 13, 2018 8:01 pm

Web Title: colors marathi serial tu majha sangati shekhar phadke