24 September 2020

News Flash

तुमच्या आवडत्या मालिकांचे पहा विशेष भाग

२४ मार्च रोजी महा रविवार विशेष भाग

कलर्स मराठी वाहिनीवरील महारविवारच्या विशेष भागात मैत्री आणि प्रेमाच्या रंगांची उधळण होणार आहे. घाडगे & सून मालिकेत अक्षय आणि अमृताचे नाते नाजूक वळणावर येऊन पोहचले आहे. जिथे कियाराच्या खोट्या वागण्याने तिने अक्षयचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे आणि यामधून बाहेर येण्यासाठी अक्षय अमृतामध्ये कुठेतरी दुरावलेली मैत्री शोधू लागला आहे. पण, अमृताला अक्षयच्या मनाची घालमेल कळते आहे, अक्षयच्या वागण्यामागचे कारण मात्र होळीच्या दिवशी अमृताला कळले आहे. आता ती हे सत्य घरच्यांना आणि अक्षयला कसे सांगणार हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आहे. याचबरोबर सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेत अनु सिद्धार्थच्या घरी येऊन गेली आहे. नेहा आणि सिद्धार्थच्या बोलण्यातून त्याला असे समजते की अनुला रंग खेळायला खूप आवडायचे. परंतु अवीच्या अचानक जाण्याने अनु आता रंगपंचमी साजरी करत नाही. रविवारी रंगपंचमी विशेष भाग रंगणार असून अनुच्या आयुष्यात सिद्धार्थ पुन्हा प्रेमाचा रंग आणू शकेल का, अक्षय – अमृता रंगपंचमी कशी साजरी करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याचबरोबर ‘महाराष्ट्र जागते रहो’ या कार्यक्रमाचा देखील विशेष भाग रविवारी पाहायला मिळणार आहे. हे विशेष भाग येत्या रविवारी म्हणजे २४ मार्च रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.

घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय अमृतासोबत रंगपंचमी खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे कियाराचे म्हणणे आहे की, मी अक्षयच्या हातानेच रंग लावून घेणार. पण हे होत असतानाच माई या सगळ्यावर काय म्हणतील, अमृता माईंना तिची बाजू कशी समजावून सांगणार, अक्षयचे यावर काय म्हणणे आहे, हे पाहायला मिळणार आहे. अनुच्या घरी सिद्धार्थ खास रंगपंचमी साजरी करण्यासाठी येणार आहे. तर दुसरीकडे दुर्गा सिद्धार्थच्या आयुष्यातून अनुला दूर करण्यासाठी नवा डाव रचणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र जागते रहो या कार्यक्रमात मन सुन्न करणारी अमानवीय, माणुसकीला लाजवणारी कुठली भयानक घटना बघायला मिळेल आणि त्या गुन्हेगाऱ्यापर्यंत पोलीस कसे पोहोचतील हे पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 2:24 pm

Web Title: colors marathi serials sunday special episodes ghadge and sunn he mann bawre and maharashtra jagte raho
Next Stories
1 #PMNarendraModiTrailer: ‘मोदींच्या बायोपिकवर बंदीची भाजपाचीच मागणी’, मिम्स झाले व्हायरल
2 वेब सीरिजच्या दुनियेत ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापूर’ आजही सर्वाधिक लोकप्रिय
3 अक्षयच्या ‘केसरी’ला पायरसीचा फटका, चित्रपट लीक
Just Now!
X