News Flash

प्रसेनजीत कोसंबीला अवधूत गुप्तेकडून खास भेट!

या कार्यक्रमा दरम्यानचा अनुभव खूपच छान होता. या कार्यक्रमाने मला एक नवी ओळख दिली.

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलिब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांनी कॅप्टनसची मनं जिंकली. अवधूत गुप्तेने कार्यक्रमामधील त्याच्या लाडक्या प्रसेनजीत कोसंबीला त्याच्या आगामी चित्रपटामध्ये गाणे गाण्याची संधी दिली असून, त्या गाण्याचे रेकॉर्डिंग ३ मे रोजी होणार आहे.

कार्यक्रमा दरम्यान “त्याचं गाणं झालं.. आणि मंचावरील सगळेच मंत्रमुग्ध झाले. तो नेहमीच छान गायचा पण, आजचा त्याचा नूर काही औरच होता, आणि म्हणुनच समोर बसलेल्या परिक्षकांकडून नेहमीच “मित्रा जिंकलंस… मित्रा तोडलंस…” ही दाद त्याला मिळायची. पण, त्यापलिकडे जाऊन दाद म्हणून मिळालं एक वचन. “मित्रा.. मी वचन देतो की माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून एक गाणं गाशील.” होय! तो मंच होता ‘सूर नवा ध्यास नवा’ चा. तसं पाहता रिअॅलिटी शोच्या मंचावर अनेक वचनं दिली जातात, पण हे वचन मात्र पाळलं गेलं. अवधूतला जेव्हा ‘वाघिर्या’ आगामी चित्रपटासाठी प्रमोशनल गाणं करायची संधी मिळाली तेव्हा त्याला आपलं वचन आठवलं आणि दिलेले वचन पूर्ण केलं

याबद्दल बोलताना प्रसेनजीत कोसंबी म्हणाला, “सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम नुकताच संपला आहे. पण, मला या कार्यक्रमातील स्पर्धक, मित्र, कॅप्टन या सगळ्यांची आठवण अजूनही येते. या कार्यक्रमा दरम्यानचा अनुभव खूपच छान होता. या कार्यक्रमाने मला एक नवी ओळख दिली. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमादरम्यान आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अवधूत दादाने मला सांगितलं होतं की, मी तुला नक्की गाण्याची संधी देईन.आणि आता कार्यक्रम संपून फक्त एकच महिना होतो आहे आणि मला त्याने त्याच्या चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली. या निमित्ताने मला अवधूत गुप्तेसोबत गाणे गाण्याची संधी मिळत आहे याचा खूप आनंद होत आहे. ही गोष्ट केवळ चित्रपटाच्याच टीमसाठी नव्हे तर ‘सूर नवा ध्यास नवा’ आणि ‘कलर्स मराठी’साठीसुद्धा प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 4:38 pm

Web Title: colors marathi sur nava dhyas nava abhijeet kosambi will sing a song for singer avdhoot guptes news marathi film
Next Stories
1 वाढत्या उन्हाळ्यात ‘कूल’ राहण्यासाठी जॅकलिन देतेय खास टीप्स
2 मृण्मयी देशपांडे ‘फर्जंद’मध्ये साकारणार हेरगिरीची भूमिका
3 Video: थक्क करणारा ‘ब्ल्यू प्लॅनेट II’ चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X