News Flash

कॉमेडियन मल्लिका दुआच्या आईचे करोनाने निधन

मल्लिकाची आई चिन्ना दुआ यांचे शुक्रवारी निधन झाले. मे महिन्यात त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

मल्लिकाची आई चिन्ना दुआ यांचे शुक्रवारी निधन झाले.

लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेत्री मल्लिका दुआच्या आईचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. काल ११ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. मल्लिकाचे वडील आणि पत्रकार विनोद दुआ यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या पत्नी म्हणजेच चिन्ना दुआ यांच्या निधनाची माहिती दिली.

मल्लिकाची आई या ५६ वर्षांच्या होत्या. चिन्ना यांचे खरे नाव हे पद्मावती होते. त्या एक डॉक्टर, गायिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर होत्या. मे महिन्यात मल्लिकाची आई आणि वडील यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्या दोघांवर गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर काही दिवसांपूर्वी विनोद यांनी माहिती दिली होती की ते दोघे आता ठीक होतं आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by M A L L I K A D U A (@mallikadua)

या आधी मल्लिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत. ते माझी काळजी घेतं आहेत. माझा हा चांगला निर्णय होता. मला आता ठीक वाटत असून थोडा खोकला आहे,” असे मल्लिका त्या पोस्टमध्ये म्हणाली होती.

मल्लिकाच्या अनेक व्हिडीओमध्ये तिची आई चिन्ना दुआ या दिसल्या होत्या. मल्लिका आणि तिची आई या खूप चांगल्या मैत्रिणी असल्याचे मल्लिकाने सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 10:21 am

Web Title: comedian and actress mallika dua s mother chinna dua passes away due to covid19 dcp 98
Next Stories
1 “शिल्पामुळे आमचं लग्न मोडलं..”, पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या आरोपांवर राज कुंद्राने सोडलं मौन
2 कतरिनामुळे सलमानने जॉनशी बोलणे केले होते बंद?
3 नुसरत जहाँचा बेबी बंपमधील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X