29 January 2020

News Flash

कॉमेडी क्वीन भारती सिंग रुग्णालयात दाखल

छातीत दुखत असल्याने मुंबईच्या संजीवनी रुग्णालयात दाखल

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भारतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली विनोदी कलाकार भारती सिंग हिला छातीत दुखत असल्याने मुंबईच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तिची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भारतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बातमी वाऱयासारखी पसरली. त्यानंतर भारतीच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. तिच्या परिचयापैकी अनेक जण रुग्णालयात तिच्यासोबत असून, लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारती सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या ‘रिआलिटी शो’चे सुत्रसंचलन करत आहे. याशिवाय, ‘कॉमेडी नाईट्स’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्येही ती काम करत आहे.

First Published on June 2, 2016 10:42 am

Web Title: comedian bharti singh hospitalised
Next Stories
1 VIDEO: ‘ढिशूम’मधला ‘तो’ क्रिकेटपटू विराट कोहलीच्या भूमिकेत?, चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
2 आणखी एका ‘देवदास’ला बॉलीवूड मुकले
3 ‘माव्‍‌र्हल’च्या आर्टिस्टने घडवली नागांची पाताळनगरी
X